इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडिया (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतामधील दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) ही शहरे अनेक दृष्टीने महत्वाची आहेत. एक देशाची राजधानी आहे, तर दुसरे आर्थिक राजधानी समजले जाते. या दोन्ही शहरात दररोज हजारो लोक कामाच्या, शिक्षणाच्या निमित्ताने येत असतात. दिवसेंदिवस दोन्ही शहरांमधील गर्दी वाढत चालली आहे. अशात या दोन्ही शहरातील मानवी बंध कुठेतरी हरवत चालला असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, दिल्ली आणि मुंबई ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात अमित्र शहरे (Unfriendliest Cities) ठरली आहेत.

‘कम्युनिटी स्पिरिट इंडेक्स: द वर्ल्ड्स फ्रेंडली सिटीज फॉर नॉन-नेटिव्ज सर्व्हे’ मध्ये ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात जगभरातील 53 शहरे सामील होती. या शहरांमधील लोक इतर शहरांतील लोकांशी कसे वागतात त्यावर हे सर्वेक्षण अवलंबून होते.

या यादीत मुंबई आणि दिल्ली जगातील टॉप 6 सर्वात अमित्र शहरांच्या यादीत आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील एकाही शहराचा फ्रेंडली सिटीजच्या यादीत समावेश नाही. या यादीच्या शीर्षस्थानी घानाची राजधानी अक्रा हे शहर आहे जे सर्वात, अमित्र ठरले आहे. यानंतर मोरोक्कोचा मारिच दुसऱ्या क्रमांकावर, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर मलेशियाचे क्वालालंपूर चौथ्या, रिओ दी जानेरो पाचव्या आणि दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: CIDCO Lottery 2023: नवी मुंबईत सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी)

सर्वात मैत्रीपूर्ण शहरांबद्दल बोलायचे तर टोरंटोचा यात पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर सिडनी, एडिनबर्ग, मँचेस्टर, न्यू यॉर्क, मॉन्ट्रियल, मेलबर्न, सॅन फ्रान्सिस्को, डब्लिन आणि कोपनहेगन या शहरांना स्थान देण्यात आले आहे. यासोबतच ‘मित्र कसे बनवायचे’ असा शोध घेणाऱ्या शहरांच्या यादीत ब्राझीलचे साओ पाउलो अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर न्यूयॉर्क आणि पॅरिसचा क्रमांक लागतो.