गेल्या कित्येक वर्षांपासून पोलिस यंत्रणा ज्या कुख्यात गुंडाला पकडण्याच्या प्रयत्नात होती तो अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी (Ravi Pujari) याला सेनेगलमधून अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये रवी पुजारी भारतीय तपास यंत्रणेच्या रडारवर होता. बॉलिवूड कलाकारांसह अनेक बांधकाम व्यावसायिक त्याच्या जाळ्यात अडकले होते. त्याला आफ्रिका खंडातील सेनेगल या देशामध्ये अटक करण्यात आली आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने हे वृत्त दिले आहे. तसेच त्याला आज भारतात आणले जाईल अशीही बातमी मिळत आहे.
स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी व कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या पूर्ण केली जात असून आज संध्याकाळी किंवा उशिरा रात्री त्याला घेऊन पोलीस भारतात परततील, अशी शक्यता आहे. मोठी कामगिरी: अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक; 15 वर्षांपासून होता फरार
रवी पुजारीला 21 जानेवारी 2019 रोजी सेनेगलची राजधानी डकारमधील एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर जून 2019 मध्ये तो फरार झाला होता. त्यानंतर त्याचा कोणताच मागमूस लागत नव्हता. आता सेनेगलमधूनच त्याच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणांना यश आलं आहे.
रवी पुजारी तावडीत सापडणे हे पोलिसांचे मोठं यश म्हणावं लागेल. कारण त्याच्याकडून त्याच्या अन्य साथीदारांची आणि त्याच्या अन्य कटकारस्थानांची देखील माहिती मिळेल.