Ujjain Viral Video | (Photo Credit: Twitter)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैनमध्ये (Ujjain) चोरीचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला मशीनला उलटे टांगून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना आठवडाभरापूर्वी घडली आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ (Ujjain Beaten Viral Video) मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शेअर झाल्यानंतर पोलिसांना गुरुवारी या घटनेची माहिती मिळाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला उलटे टांगलेले पाहायला मिळते. तसेच, दुसरा एक जण या व्यक्तीला काटीसदृश्य वस्तूने बेदम मारहाण करताना दिसतो आहे.

व्हिडीओमध्ये मारहाण होत असलेली पीडित व्यक्ती विनवणी करताना आणि माफी मागताना दिसते. दरम्यान, बघ्यांपैकी एक व्यक्तती मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या हातातील काठी घेऊन त्याला मारण्यापासून थांबवताना दिसतो. परंतू, काठी हातात असलेला व्यक्ती इतका बेभान झाला आहे की, तो कोणाचेही न ऐकता टांगलेल्या व्यक्तीला मारणे सुरुच ठेवताना पाहायला मिळते आहे. (हेही वाचा, Wife Beats Husband: वाचवा! बायको खूपच मारते हो, त्रस्त नवऱ्याकडून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार)

दरम्यान, व्हिडिओत ऐकू येते आहे की, एक व्यक्ती मारहाण करणाऱ्या व्यक्तीस सूचना देतो आहे. पीडित व्यक्तीच्या पायावर काठी मार असे सांगून तो त्याला चेथवातानाही आढळतो. मारहाण करणारा व्यक्ती त्याला मिळालेल्या सर्व सूचनांचे पालन करताना दिसतो.

ट्विट

व्हायरल झालेला संपूर्ण व्हिडिओ हिंदी भाषेत असल्याचे जाणवते. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी इंगोरिया पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिजावाता गावात घडल्याचे सांगण्यात येत आहे. लेटेस्टली मराठी घटना आणि व्हिडिओची पुष्टी करत नाही. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका पोलिस अधिकाऱ्याला एका व्यक्तीने या घटनेची माहिती दिली, परंतु त्याने कारवाई केली नाही. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अधिकाऱ्याला निलंबित करून पोलिस लाईन्समध्ये पाठवण्यात आले आहे, असे समजते.

व्हिडिओ ऑनलाइन आल्यानंतर आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. आम्ही तपास सुरू केला असून लवकरच अटक करण्यात येईल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्याचे एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, अत्याचारामुळे अपमानित होऊन पीडिताने गाव सोडले असून, त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे समजते.