'मुंबई'तील 2 वर्षांच्या मुलाने केले हृदयदान; यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेने चेन्नईतील मुलाचे प्राण वाचले
Representational Image (Photo Credits: Max Pixel)

मुंबईतील (Mumbai) एका दोन वर्षांच्या मुलाने हृदयदान करुन तामिळनाडू (Tamil Nadu) येथील एका त्याच्याच वयाच्या मुलाचे प्राण वाचले आहेत. चेन्नईतील (Chennai) एका खासगी रुग्णालयात हृदयदान केल्यामुळे पीडित मुलाला जीवनदान मिळाले आहे. या मुलाला डायलेट कार्डिओमायोपॅथी नावाचा हृदयविकार होता. श्वास घेताना त्याला सतत त्रास व्हायचा. औषधोपचरांनीही प्रकृती सुधारणा होत नसल्याने त्याला हृदयप्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला होता.

मुंबईत राहणाऱ्या एका 2 वर्षांच्या मुलाचा मेंदू मेंदूच्या व्याधीमुळे मृतावस्थेत गेला होता. त्यामुळे या मुलाच्या कुटुंबाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. ग्रीन कॉरिडॉर करुन विमानतळावरुन चेन्नईत रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असलेल्या मुलासाठी पाठवण्यात आले. राष्ट्रीय अवयवदान दिनी दूर करा अवयव दानाबाबतचे हे '5' समज -गैरसमज

चेन्नईमध्ये ज्या रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली तेथील कार्डियाक सायन्सेसचे कार्डियाक सायन्सेसचे संचालक डॉ. के.आर बालक्रिश्नन आणि क्रिटिकल केअर आणि कार्डियाक अनेस्थेशिया विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश राव यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यात आली. तसंच पुढील औषधांचा खर्चही उचलण्यात येणार आहे.