Representational image. (Photo Credits: Pexels)

दिल्ली-पाटणा इंडिगो फ्लाइट 6E-6383 मध्ये काल धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्लीहून पटण्याला जाणाऱ्या विमानात दोन मद्यधुंद प्रवाशांनी विमान प्रवासादरम्यान जोरदार राडा केला आहे. दिल्ली-पटणा प्रवासादरम्यान या दोन मद्यधुंद प्रवाशांनी विमानातील क्रू मेंबर सोबत वाद घातला असुन सहप्रवाशांची चुकीच्या पध्दतीने व्यवहार केला असल्याची माहिती इंडिगोकडून एटीसीला देण्यात आली होती. तर विमान लॅन्ड केल्यावर लगेचं इंडिगोने पाटणा विमानतळावरील संबंधित प्राधिकरणाकडे विमानात प्रवाशांसह मद्यधुंद प्रवाशांची केल्याची अधिकृत तक्रार दाखल केली. तरी या संपूर्ण गोंधळानंतर चालक दलातील सदस्यांनी मद्य प्राशन केल्यामुळे या दोन्ही मद्यधुंद प्रवाशांना थांबवून, त्यांची विचारपूस करत त्यांच्याकडून लेखी माफी घेतली. तरी सीआयएसएफच्या मदतीने पाटणा विमानतळ पोलिसांनी या दोन मद्यधुंद प्रवाशांना अटक केली असुन इंडिगोच्या व्यवस्थापकाच्या लेखी तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आल्याचं पाटणा विमानतळ एसएचओ सांगितलं.

 

दिल्ली ते पाटणा इंडिगो फ्लाईटने प्रवास दोन मद्यधुंद अवस्थेत प्रवास करत असणाऱ्या आरोपी प्रवाशांची अल्कोहोल विश्लेषक उपकरणाने तपासणी केली असता त्याचा निकाल पॉझिटीव्ह आला आणि या दोन्ही प्रवाशांवर गुन्हा नोंदवल्याची माहिती पटणा पोलिसांनी मध्यमांशी बोलताना दिली आहे. तरी आता या दोन्ही प्रवाशांवार नेमक काय ठोस कारवाई करण्यात येईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:- Air India passenger urinating case: एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी)

 

दिल्ली-पाटणा इंडिगो फ्लाइट 6E-6383 मध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातलेल्या प्रवाशांचे नावं रोहित आणि नितीश असे आहे. या दोन्ही प्रवाशांना सघध्या पाटणा विमानतळ पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. इंडिगोच्या व्यवस्थापकाने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी या प्रकाराची चौकशी कुठल्या पध्दतीने होणार तसेच हे दोन्ही तरुणांची या कृत्यावर काय प्रतिक्रीया असेल याबाबत शंककुशंका उपस्थित केल्या जात आहे. तर नुकत्याचं एअर इंडियाच्या विमान प्रवासा दरम्यान घडलेल्या घटना बघता विमान प्रवासा दरम्यान हे नेमक चाल्लय काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.