Satyajit Biswas and Mukul Roy (Photo Credit Twitter)

पश्चिम बंगाल येथील तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार सत्यजित बिश्वास (Satyajit Biswas) यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिस स्थानकात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी हन्सखली पोलिस स्टेशनचे ठाणेकर यांना निलंबित करण्यात आले आहे.

सत्यजीत बिश्वास हे कृष्णगंज मतदारसंघातील आमदार होते. काल सरस्वती देवीची पूजा सुरु असताना त्यांच्यावर एका अज्ञात इसमाने गोळीबार केला. त्यानंतर तात्काळ त्यांना शक्तीनगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सत्यजित यांच्या हत्येमागे भाजपच्या मुकूल रॉय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्ता यांनी केला आहे. तृणमूलच्या काही विश्वासघातकी लोकांना यासाठी भाजपला मदत केल्याचे आरोपही तृणमूल काँग्रेसने केला आहे.

कोण आहेत मुकुल रॉय?

मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार होते. त्यांनी मनमोहन सिंग सरकारच्या अधिपत्याखाली रेल्वे मंत्रालयाचा कारभार सांभाळला आहे. ममता बनर्जी यांच्या सोबतच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला.