
त्रिपुरा (Tripura) येथे गाय चोरत असल्याच्या संशयावरुन जमावाकडून एका व्यक्तीला बेदमारहाण करण्यात आली. या प्रकरणी मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बुधी कुमार असे व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
बुधी हे गावातील एका गोठ्याजवळ गेले होते. तेव्हा गोठ्याजवळ असलेल्या घरातील मालकाने त्याच्यावर ओरडणे सुरु केले. मालकाच्या आरडाओरडीमुळे गावातील अन्य ग्रामस्थ जमा झाल्याने बुधी याला त्यांनी जबर मारहाण केली. तर बुधी याने ग्रामस्थांपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला गावकऱ्यांनी पकडून ठेवल्याने त्याला तेथून निघता आले नाही.(कर्नाटक येथे रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक जखमी)
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर मारहाण केलेल्या बुधीला गंभीर दुखापत झाल्याने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार करुनही बुधी याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.