Arrest pixabay

चक्क तिरंग्याने (Tricolour) कोंबडी साफ करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओबाबत युजर्समध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना दादरा आणि नगर हवेली येथील आहे जिथे सिल्वासा येथील एक व्यक्ती मांसाच्या दुकानात तिरंग्याचा वापर करून कोंबडी साफ करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

सिल्वासा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने तिरंग्याचा वापर ज्या प्रकारे केला आहे तो स्पष्टपणे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. पोलिसांनी सांगितले की, हा व्हिडिओ ज्या दुकानातील त्याच ठिकाणी हा व्यक्ती काम करतो. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या कलम 2 अन्वये अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीला गुरुवारी (20 एप्रिल) अटक करण्यात आली आणि शुक्रवारी (22 एप्रिल) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. अशा प्रकरणात दोषींना सुमारे 3 वर्षांची शिक्षा, दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. दुसरीकडे, सोशल मीडियावर या व्यक्तीबाबत युजर्स संताप व्यक्त करताना दिसत आहेत. एका यूजरने आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुसर्‍याने लिहिले की हे अत्यंत निषेधार्ह आहे. असे करणे हा देशाचा अपमान आहे. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, अशा लोकांना देशात राहू देऊ नये. (हेही वाचा: Karnataka: भाजपच्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्याने पुसले PM मोदी यांच्या कटाऊटवरील पावसाचे पाणी)

दरम्यान, अशी अनेक प्रकरणे सोशल मीडियावर समोर येतात, ज्यामध्ये लोक उघडपणे राष्ट्रध्वजाचा अनादर करताना दिसतात. पण असे केल्यास त्यांना काय त्रास सहन करावा लागतो याची लोकांना कल्पना नसते. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास कडक शिक्षा होऊ शकते.