Coronavirus Update: भारतात मागील 24 तासांत आढळले 48,661 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण तर 705 कोरोना संक्रमितांचा मृत्यू
Covid 19 (Photo Credit Twitter)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) अक्षरश: हाहाकार माजविला असून मागील 24 तासांत देशात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, काल (25 जुलै) दिवसभरात 48,661 कोरोना पॉझिटिव्ह Corona Positive) रुग्ण आढळले असून 705 रुग्ण दगावले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 13,85,522 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 32,063 वर जाऊन पोहोचला आहे. देशात सद्य घडीला 4,67,882 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच आतापर्यंत एकूण 8,85,577 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

देशात आजवर कोरोना व्हायरसाठी 1,62,91,331 चाचण्या घेण्यात आल्या आहेत यापैकी 4,42,263 चाचण्या तर केवळ 24 तासात घेतलेल्या आहेत, यासंदर्भात आयसीएमआरने माहिती दिली. कोरोना व्हायरस चा वास कुत्रे ओळखू शकत असल्याचा जर्मन अभ्यासकांचा दावा, वाचा सविस्तर

देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 66 हजार 368 वर पोहोचली आहे. राज्यात 1 लाख 45 हजार 481 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 2 लाख 7 लाख 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालया (State Health Department) ने माहिती दिली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली आणि गुजरात मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.