Torrent Group (संग्रहित संपादित प्रतिमा)

Torrent Group to Donate 5,000 Crore: टोरेंट ग्रुप (Torrent Group) चालवणारे अब्जाधीश बंधू सुधीर मेहता आणि समीर मेहता यांनी रविवारी (31 मार्च 2024) ग्रुपचे संस्थापक आणि त्यांचे वडील उत्तमभाई नाथालाल पटेल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की त्यांच्या ग्रुपने सामाजिक कारणांसाठी 5000 कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन दिले आहे. महत्वाचे हे योगदान टोरेंट ग्रुपच्या कंपन्यांच्या वैधानिक सीएसआर (CSR) योगदानाव्यतिरिक्त असेल. ही देणगी युएनएम फाउंडेशन द्वारे व्यवस्थापित केली जाईल. या देणगीचा उपयोग आरोग्य सेवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचे शिक्षण तसेच पर्यावरण आणि कला यांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल.

या घोषणेसोबत फार्मास्युटिकल्स, पॉवर आणि गॅस क्षेत्रातील हा नामांकित समूह सामाजिक सेवाकार्यासाठी एवढी मोठी देणगी देणाऱ्यांच्या यादीत सामील झाला आहे. समूहाने जारी केलेल्या प्रकाशनात म्हटले आहे की ते, 1 एप्रिलपासून पाच वर्षांसाठी युएनएम फाउंडेशनला 5,000 कोटी रुपये किंवा सुमारे $600 दशलक्ष देणगी देण्यास सुरुवात करतील.

टोरेंटचे संस्थापक उत्तमभाई नथालाल पटेल यांनी 1959 मध्ये या समूहाची स्थापना केली होती. आज, हा एक बहुराष्ट्रीय समूह आहे जो अहमदाबाद, गुजरात येथे स्थित आहे. आता हा ग्रुप उत्तमभाई नाथालाल मेहता यांची मुले सुधीर आणि समीर चालवतात. शनिवारी (30 मार्च 2024) या दोन भावांनी एका कार्यक्रमाचे आयोजन करून वडिलांची जन्मशताब्दी साजरी केली. (हेही वाचा: BYJU Layoffs 2024: आर्थिक संकटात सापडलेल्या बायजूसने १,५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ)

टोरेंट ग्रुपचे चेअरमन समीर मेहता यांनी याबाबत सांगितले की, ‘युएनएम फाउंडेशन ही रक्कम अनोखे सामाजिक कार्य करण्यासाठी वापरणार आहे. जात, धर्म, लिंग यांचा विचार न करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना हा लाभ दिला जाईल.’ टोरंट ग्रुपचे नेटवर्थ साधारण 5 हजार अरब डॉलर इतके आहे.