टिक टॉक (TikTok) व्हिडीओची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली असलेली दिसत आहे. अशा व्हिडीओजमुळे अनेकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे. आता बिहारच्या आरा जिल्ह्यातील सदर हॉस्पिटलमधील एक टिक टॉक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हा व्हिडीओ शूट झाला आहे. या व्हिडीओमध्ये अश्लील भोजपुरी गाण्यावर एक तरुण नाचताना दिसत आहे. इमर्जन्सी वॉर्डच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एक तरुण कसा दाखल झाला याविषयी रुग्णालय व्यवस्थापनाला काहीही माहिती नाही. त्यामुळे आता प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
TikTok Video -
अजब-गजब: बिहार में इस अस्पताल के emergency ward के operation theater में युवक ने लगाया ठुमका, video viral#bihar #emergencyward #operationtheater #videoviral pic.twitter.com/d4HJjzdLuu
— kajal lall (@lallkajal) December 12, 2019
इमर्जन्सी वॉर्डच्या ऑपरेशन थिएटरमध्ये अज्ञात युवकाने प्रवेश करून हा व्हिडीओ बनवला. मात्र हा व्हिडिओ कसा व केव्हा बनविण्यात आला हे स्पष्ट झाले नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हा तरुण नक्की कोण आहे हे देखील हॉस्पिटल प्रशासनाला माहित नाही. या बाबत रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन एल. पी झा यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडून अहवाल मागविला आहे. सिव्हिल सर्जनच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ तयार करणारा हा तरुण हॉस्पिटलचा कर्मचारी नाही हे स्पष्ट झाले आहे. (हेही वाचा: पुण्यात गुंडाचा धारधार हत्यार घेऊन Tik Tok व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून अटक (Video))
सदर रुग्णालयाच्या आपत्कालीन प्रभागातील ऑपरेशन थिएटरमध्ये चोवीस तास सेवा दिली जाते. इथे तीन शिफ्टमध्ये डॉक्टर, कंपाऊंडर, ड्रेसर, एएनएम / जीएनएम आणि वॉर्ड बॉयची ड्युटी असते. याशिवाय आपत्कालीन प्रभागातील मुख्य वॉर्ड आणि डॉक्टरांच्या खोलीजवळही सुरक्षा रक्षकांचे पहारेकरी असतात. असे असताना हा तरुण केवळ ओटीमध्ये घुसलाच नाही, तर त्याने तिथे टिक टॉक व्हिडिओ देखील बनविला आहे. मात्र इथली सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.