Tiger Attack in Rajasthan: राजस्थानच्या सरिस्का राष्ट्रीय उद्यानातून भटकल्यानंतर वाघाने चार लोकांवर हल्ला केला आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना खैरतल तिजारा जिल्ह्यात घडली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. गावात वाघ शिरल्याने गावकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. वाघाचा हल्ला झाल्यानंतर गावकऱ्यांनी वन विभागांना माहिती दिली. (हेही वाचा- धोकादायक किंग कोब्राशी लहान मुलाची मैत्री, किंग कोब्रासोबत खेळण्यासारखे खेळताना दिसला लहान मुलगा)
मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाला माहिती मिळताच, २ पथके कामाला लागली आहेत. वाघाला शोधण्याचे काम सुरु आहे. वाघ ( ST 2303) दरबारपूर गावातील शेतात शिरला आहे. वाघाला शोधण्यासाठी एक पथक परिसरात तळ ठोकून आहे. तर दुसरी टीम जयपूरमधून बोलवण्यात आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
राजस्थान : अलवर में टाइगर रिजर्व क्षेत्र से भागे एक टाइगर ने 5 लोगों पर हमला बोला। रेलवे कर्मचारी का हाथ चबा गया। ये 110 KM दूर भागकर हरियाणा बॉर्डर पर पहुंच गया है। इससे 3 गांवों में दहशत है। स्कूल की छुट्टी की गई। लोगों से कहा गया कि वो अकेले ना निकले। pic.twitter.com/GRGYKIrSQP
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) August 15, 2024
या घटनेसंदर्भात माहिती देताना एका ग्रामस्थांनी सांगितले की, शेतात काम करत असताना गावकऱ्यांना वाघ वदिसला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. वाघाचा शोध घेण्यासाठी गावकऱ्यांनी हल्ला करण्यास सुरु केला. दरम्यान वाघाने हल्ला केला ज्यात तीन जण जखमी झाले. वाघाने महेंद्र, वीरेंद्र आणि सतीश यांच्यावर हल्ला केला. सतीशच्या हातावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. या आधी गावातील विकास कुमार हा रेल्वे कर्मचारी सकाळी कामावरून घराकडे जात असताना त्याच्यावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर वाघ दरबारपूर गावात पोहोचला आणि शेतात जाऊन लपला होता.