Ticket Transfer Rule: आपली कंन्फर्म ट्रेनची तिकिट एखाद्याला कशी करु शकता ट्रान्सफर, जाणून घ्या रेल्वेच्या नियमाबद्दल अधिक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

How To Transfer Confirmed Train Ticket To Someone Else: जर तुम्ही तुमची तिकिट कन्फर्म केली असेल आणि तुम्हाला प्रवास करण्याचा प्लॅन रद्द झाल्यास तुम्ही आपले रिजर्वेशन तिकिट एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर करु शकता. ही सुविधा फक्त परिवारातील अन्य सदस्यांसाठीच उपलब्ध आहे. तर जाणून घ्या रेल्वेच्या या नियमाबद्दल अधिक.(PF Nomination Update: पीएफ धारकांना पूर्ण फायदा मिळवण्यासाठी EPF/EPS Nomination Online करणं गरजेचं; पहा स्टेप बाय स्टेप ते कसं कराल?)

रेल्वे अशी एक सेवा देते जेथे तुम्ही आपले तिकिट एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर करु शकता. जेव्हा एखादा व्यक्ती आपली तिकिट बुक केल्यानंतर प्रवास करण्यास असमर्थ असेल तर त्याला तिकिट रद्द करावी लागते. अशातच त्याला तिकिट रद्द केल्याबद्दचे शुल्क वगळून अन्य पैसे परत दिले जातात. तसेच तुमच्या ऐवजी दुसऱ्याला प्रवास करायचा असेल तर त्याला नवे तिकिट घ्यावे लागते.

दरम्यान, प्रत्येक वेळी कंन्फर्म तिकिट मिळणे हे सहज शक्य होत नाही, कारण रेल्वेने कंन्फर्म तिकिट ट्रान्सफर करण्याची सुविधा आता नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही तुमचे आई-वडिल, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी किंवा नवरा-बायको यांनाच कंन्फर्म तिकिट ट्रान्सफर करु शकता. तिकिटाचे ट्रान्सफर फक्त एकदाच केले जाऊ शकते. म्हणजे एखाद्याने आपले तिकिट दुसऱ्याला ट्रान्सफर केले असेल तर तो ते तिकिट अन्य कोणालाही ट्रान्सफर करु शकत नाही.

आपले तिकिट ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वी कमीत कमी 24 तास आधी तुम्ही प्रवास करण्यास असमर्थ असल्याचे सांगायचे असते. त्यानंतरच त्या तिकिटावरील नाव बदलून दुसऱ्या व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा मिळते.(Hallmarking Yojana: एक कोटींहून अधिक दागिन्यांवर हॉलमार्क तर 90,000 हून अधिक सराफांची नोंदणी पूर्ण) 

>>'या' पद्धतीने करा आपले तिकिट ट्रान्सफर

-प्रथम तिकिटाची प्रिंटआउट काढा.

-जवळच्या रेल्वे स्थानकातील तिकिट काउंटरवर जा.

-ज्या व्यक्तीला तुम्ही तिकिट ट्रान्सफर करु इच्छिता त्याचा आयडी प्रुफ आणि त्याच्यासोबतचे नाते काय हे तुम्हाला सांगण्यासाठी एखादे कागदपत्र जरुर सोबत घेऊन जा.

-काउंटरवर तिकिट ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करा.

-तिकिट ट्रान्सफर करण्याप्रकरमी कोणतेही कॅन्सलेशन किंवा रिजर्वेशन शुल्क आकारला जात नाही.

ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही तिकिट बुक करु शकता. ज्या व्यक्तीला तुम्हाला तिकिट ट्रान्सफर करायचे आहे त्याने स्टेशन प्रबंधक किंवा मुख्य आरक्षण पर्यवेक्षकासोबत संपर्क करावा. त्यानंतर आपला अर्ज त्याला द्यावा. दरम्यान, ग्रुप ट्रॅव्हलिंग प्रकरणी ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वी 48 तास आधी या बद्दल सांगावे लागते. तसेच अधिकाधिक ग्रुपच्या दहा टक्के प्रवाशांचे नाव बदली करण्याची परवानगी असते.

येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, रिजर्वेशनमध्ये नावात बदल करण्यासंबंधित परवानगी फक्त संबंधित मंडळाच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधकाद्वारे दिली जाते. जेथे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधकाचे कोणतेही पद नाही तेथे ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वी 24 तास आधी नियमाअंतर्गत आवश्यक कागदपत्रांसह प्रवाशाच्या लेखी मागणीवर संबंधित मंडळाच्या मंडळ वाणिज्यिक प्रबंधक द्वारे रिजर्वेशनच्या नावावर परिवर्तन करण्याची परवानग दिली जाऊ शकते. तर स्टेशन प्रबंधक सुद्धा नियमाअंतर्गत रिजर्वेशन मध्ये परिवर्तन करण्याची परवानगी देण्यास सक्षम आहे.