Representational Image (File Photo)

Jharkhand Crime: आहे. ही घटना दोंडिया पिपरडांगा गावातील तलावाजवळ घडली आहे. तिन्ही मुले याच गावातील होती, बासुदेव यादव आणि हरिकिशोर यादव यांच्या कुटुंबातील होती. गावातील काही लोकांनी मुलांची हत्या केली आणि मृतदेह पाण्यात फेकले असा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- उत्तर प्रदेशात कलियुगी बापानेच 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी गेली होती. मुले घरी परतलीच नाही म्हणून कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मुले बेपत्ता झाली होती. गुरुवारी सायंकाळी उशीरा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी देखील मुलांना शोधण्यासाठी अनेक ठिकाणी तपासणी केली. पोलिसांनी गावातील तलावात शोध घेण्यास सुरुवात केली. तिथे तीन मुलांचे मृतदेह सापडले.

हरिकिशोर यादव यांनी या प्रकरणात सांगितले की, गावातील विनोद, रितलाल, मनोज, नवल आणि शंभू यांनी जमिनीच्या वादातून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. त्यानंतर धमकी देखील दिली. आठवडाभरापूर्वी यावरून मारामारी झाली होती आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली, परंतु त्यांनी योग्य वेळीस कारवाई केली नाही. पोलिसांनी कारवाई केली असती तर आज तिन्ही मुले जिवंत असती.

पोलिस शुक्रवारी गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना घेरलं. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. घटनास्थळी डीएसपी ह्रतिक श्रीवास्तव आणि अनेक पोलिस ठाण्याचे पोलिस आले. लोकांनी संपात व्यक्त केला. आरोपीला अटक करण्याची मागणी केली. शुक्रवारी दुपारी दोन वाजे पर्यंत मुलांचे मृतदेह गावात पडून होते. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह बाहेर काढून देणार नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.