Amethi Shocker: उत्तर प्रदेशातील अमेठीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका कलियुगी पित्याने बाप-लेकीच्या नात्याला लाजवेल असे कृत्य केले आहे. आरोपी पित्याने स्वतःच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवली आहे. मुलीने पोलिसांना सांगितले की, 4 ऑगस्ट 2024 रोजी तिच्या आई-वडिलांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याची आई बहिणीला भेटायला दिल्लीला गेली. यावेळी 8 ऑगस्टच्या रात्री संधीचा फायदा घेत आरोपीने अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत बलात्कार केला. मुलीने याला विरोध केल्यावर वडिलांनी तिला बेदम मारहाण केली आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या आईचे 10 ऑगस्ट रोजी दिल्लीत निधन झाले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिने वडिलांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हे देखील वाचा: Thane Rape Case: लग्नाला नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय आरोपीला अटक
कलियुगी बापाने लेकीवरच केले अत्याचार
दिनांक 14.08.2024 को थानाक्षेत्र बाजार शुक्ल की एक पीड़िता द्वारा अपने पिता के विरुद्ध दुष्कर्म करने की तहरीर देने पर थाना बाजार शुक्ल पर सुसंगत धाराओं में अभियोग पंजीकृत कर टीम बनाकर अभियुक्त की तलाश व शीघ्र गिरफ्तारी के संबन्ध में #CO_मुसाफिरखाना द्वारा दी गयी बाइट। pic.twitter.com/7W1NvV5akR
— AMETHI POLICE (@amethipolice) August 15, 2024
घटनेची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुसाफिरखाना सीओच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलीने 14 ऑगस्ट रोजी तिच्या वडिलांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या हाती लागेल.