viral video

Homeless Burmese Teacher Video: परिस्थिती माणसाला काय करायला लावेल याचा नेम नाही, सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओत  एका कंटेट क्रिएटरने या वृध्द महिलेशी इंग्रजीत संवाद साधला. यात व्हिडिओच्या माध्यमांतून वृध्द महिलेने सर्व परिस्थिती सांगितली. इंग्रजी बोलत असताना देखील महिला आयुष्य जगण्यासाठी भीक मागत आहे. तेही वयाच्या ८१ वर्षी. हे पाहून नेटकरी देखील आवाक झाले आहे. तीचं इग्रजी ऐकून नेटकऱ्यांनी तीला चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर कंटेट बनवणारा मोहम्मद आशिक असं नाव असलेल्या तरुणाने या वृध्द महिलाचा मुलाखत घेतला. तीचं नाव मर्लिन आहे. ती ८१ वर्षाची आहे. त्यावेळी तीने म्यानमार येथली असल्याचे सांगितले. लग्न झाल्यावर ती तिच्या नवऱ्यासोबत चैन्नई येथे आली.  ती म्यानमार येथे शिक्षिका होती. विद्यार्थ्यांना ती इंग्रजी आणि गणित विषय शिकवाची. कालांतराने तीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. सासरच्या मंडळीचा देखील मृत्यू झाला. ती घरात एकटीच  राहिली. आपलं पोट भरण्यासाठी भीक मागण्याची परिस्थिती आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohamed Ashik (@abrokecollegekid)

नेटकरी हा व्हिडिओ पाहून भावूक झाले. काहीनी तीला मदत करण्यासाठी विंनती केली. तर मुलाखत घेणाऱ्या मुलाने त्याच्याकडून इंग्रजी शिकून घेण्यासाठी सांगितले. तरुणाने त्या महिलेच्या (English with Marlin) नावाने सोशल मीडियावरती एक पेज तयार केलं आहे. आता ती महिला लोकांना इंग्रजी शिकवत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला अनेक जणांनी प्रतिक्रिया दिला आहे.