बँक खाते सुरु करण्यापूर्वी ग्राहकाला केवायसी फॉर्म भरुन द्यावा लागतो. त्यावर ग्राहकाची संपूर्ण माहिती देण्यासोबत काही महत्वाची कागदपत्र सुद्धा खाते सुरु करताना दाखवावे लागतात. तर बँक खाते सुरु करताना धर्माची बाबत माहिती द्यावी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु यावर आता सरकारने स्पष्टीकरण दिले असून, ग्राहकाला धर्माबाबत माहिती देणे अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे.
अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सचिव राजीव कुमार यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोणत्याही भारतीय नागरिकाला बँक खाते सुरु करण्यासाठी किंवा जुने खात्यासंबंधित केवायसी करयाची झाल्यास त्यावेळी धर्माची माहिती देण्याची गरज नाही. त्यामुळे जनतेने अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच सरकारने असे ही म्हटले आहे की, काही मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी धर्माबाबात माहिती देणे अनिवार्य असल्याचे सांगितले होते.(सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमात सरकारकडून बदल, जाणून घ्या)
Rajeev Kumar Tweet:
There is no requirement for #Indian citizens to declare their religion for opening/ existing #Bank account or for #KYC. Do not fall for baseless rumours about any such move by Banks @PIB_India @DDNewsLive @PTI_News @FinMinIndia @PMOIndia
— Rajeev kumar (@rajeevkumr) December 21, 2019
तर काही दिवसांपूर्वीच RBI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, NEFT अंतर्गत आर्थिक व्यवहारांची सुविधा आता आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध होणार आहे. यामुळे ऑनलाईन करणा-या असंख्य ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. ही सेवा 24 तास सुरु केल्याने सुट्टीच्या दिवशी गैरसोय होणा-या ग्राहकांना याचा अधिकाधिक लाभ होणार आहे.