संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Parliament Budget Session 2023) मंगळवारपासून (31 जानेवारी 2023) सुरू झाले आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणाने झाली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या खासदारांना संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितले की, गेल्या 9 वर्षांत भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. विद्यमान सरकारच्या आतापर्यंतच्या जवळपास नऊ वर्षांच्या कार्यकाळात भारतातील जनतेने प्रथमच अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे आज प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुढे बोलताना सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृतकाळा हा 25 वर्षांचा काळ, स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारताच्या निर्मितीचा कालखंड आहे. ही 25 वर्षे आपल्या सर्वांसाठी आहेत आणि देशातील प्रत्येक नागरिकासाठी आपण आपले कर्तव्य पार पाडले आहे. (हेही वाचा, Women's Equality Day 2022: भारताची मान अभिमानाने उचावण्यात 'या' महिलांचा आहे मोलाचा वाटा; महिला समानता दिनामिनित्त जाणून घ्या देशाचे मूल्य वाढवणाऱ्या महिलांविषयी)
भगवान बसवेश्वरांनी 'कायकवे कैलास' असे सांगितले होते. अर्थात कर्म ही उपासना आहे, शिव कर्मात आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन माझे सरकार राष्ट्र उभारणीचे कर्तव्य चोखपणे पार पाडत आहे, असेही मुर्मू या वेळी म्हणाल्या.
ट्विट
Wherever there is political instability anywhere in the world, those countries are surrounded by a massive crisis. But due to the decisions my govt took in the national interest, India is in a better position as compared to other countries: President Draupadi Murmu pic.twitter.com/UlpcZXqC2m
— ANI (@ANI) January 31, 2023
त्या म्हणाल्या की, आज या अधिवेशनाच्या माध्यमातून मी देशवासीयांचे आभार मानू इच्छिते. त्यांनी सलग दोनदा स्थिर सरकार निवडून दिले. माझ्या सरकारने नेहमीच राष्ट्रीय हितांना प्राधान्य दिले आहे आणि धोरण आणि धोरणात संपूर्ण बदल करण्याची इच्छाशक्ती दाखवली आहे.
भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे माझ्या सरकारचे स्पष्ट मत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. त्यामुळे गेल्या वर्षांपासून भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने लढा सुरू आहे. व्यवस्थेत प्रामाणिक लोकांचा आदर केला जाईल याची आम्ही काळजी घेतली आहे.