धक्कादायक! दुसरीही मुलगी झाली म्हणून आईनेच चिरला पोटाच्या लेकीचा गळा; नवऱ्यानेही दिली साथ
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

देशात एकीकडे मुलगी जन्माला आली म्हणून उत्सव साजरा केला जातो, सरकारदेखील वेळोवेळी मुलींच्या जन्माबाबत जनजागृती करत आहे. मात्र मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मध्ये दुसऱ्यांदाही मुलगी जन्माला आली, म्हणून एका महिलेने आपल्या नवजात मुलीचा (Newborn Girl) चक्क धारधार शस्त्राने (Sharp Weapon) खून केला. ही घटना 13 फेब्रुवारीची आहे. मंजु असे आरोपी महिलेचे नाव आहे. आपल्या नवजात मुलीचे पोट आणि मानेवर तिने वार केले.

मुलीची किंकाळी ऐकून शेजार पाजारी जमा झाले, त्यावेळी मंजूच्या हातात शस्त्र व मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे दिसून आले.

शेजार्‍यांनी मुलीला तातडीने शाजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले, प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये रेफर केले. 14 फेब्रुवारी रोजी इंदूरच्या एमवाय रुग्णालयात उपचारादरम्यान निष्पाप जीव मृत्यू पावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांनी डॉक्टरांसमोर प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याची एक खोटी कहाणी सांगितली. या प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी पोलिसांनी मंजू, तिचा नवरा आणि इतर चार नातेवाईकांना ताब्यात घेतले. (हेही वाचा: धक्कादायक! नागपूरच्या कळमेश्वरभागात बालवाडीतून घरी येणाऱ्या 5 वर्ष मुलीचा दगडाने ठेचून खून)

पोलिसांनी जेव्हा कठोरपणे या गोष्टीची चौकशी सुरु केली तेव्हा, घाबरून मंजूने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. दुसऱ्या वेळीही मुलगा झाला नसल्याने, रागाने आपणच आपल्या नवजात मुलीची हत्या केल्याचे तिने मान्य केले. मंजूला याआधी एक मुलगी आहे. मंजूने 12 फेब्रुवारी रोजी रात्री 12.25 वाजता मुलीला जन्म दिला. रक्तस्त्राव झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शाजापूर येथे रेफर केले. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अपूर्ण उपचारानंतर कुटुंबियांनी मंजूला घरी आणले. यादरम्यान मुलीची तब्येतही खराब झाली होती.