Representational Image | Economy (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे सध्या भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) ढासळली आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्याने, उद्योगधंदे बंद पडल्याने भारताला फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशात रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody's) म्हटले आहे की 2020 च्या उत्तरार्धात उदयोन्मुख अर्थव्यवस्थेपासून भारताची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. यासह, हे 2021 च्या शेवटच्या महिन्यांत ती कोविडपूर्व पातळीवर (Pre-Coronavirus Level) पोहोचू शकते. ग्लोबल मॅक्रो आउटलुक 2020 अपडेट करत, रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की कोविड-19 दरम्यान आर्थिक क्रिया अत्यंत मंद होत्या, याशिवाय पुढील वर्षापर्यंत लस येण्याची शक्यता नाही.

एजन्सीने म्हटले आहे की भारत, इंडोनेशिया आणि चीनची अर्थव्यवस्था 2020 च्या उत्तरार्धात रिकव्हर होऊ शकते. रेटिंग एजन्सीने भारताच्या वाढीचे मूल्यांकन बदलले नाही. 2020-21 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 3.1 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता एजन्सीने व्यक्त केली आहे, तर 2021 मध्ये यात 6.9 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. चीनची अर्थव्यवस्था सध्या जलद गतीने वाढत सध्या 1.2 टक्क्यांवर आली आहे, पूर्वी 1 टक्के दराने वाढ होण्याचा अंदाज होता.

माहितीनुसार अनेक विकसित देशांतील वस्तूंची मागणी वाढू शकते आणि वापर वाढू शकतो. मात्र, कोविड-19 च्या भीतीमुळे अर्थव्यवस्था रिकव्हर होण्याचे प्रमाण मंद असू शकते. मूडीजने जी -20 अर्थव्यवस्थेत 4.8 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, मेक्सिको, इंडोनेशिया आणि अर्जेंटिना या देशांच्या अर्थव्यवस्थेतील घसरण होण्याचा अंदाज आहे. (हेही वाचा: Lockdown काळात अर्थव्यवस्था 200 bps ने घसरु शकते, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे कोरोना व्हायरस संकटावर भाष्य)

मूडीजने सांगितले आहे की, भारतातील पायाभूत सुविधांवर खर्च वाढवून विकास साधला जय शकतो, मात्र इथे त्यांनी बँकांच्या कमकुवतपणाकडेही लक्ष वेधले आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाचा आशियाई देशांवर वाईट परिणाम होऊ शकतो असेही मूडीज यांनी म्हटले आहे.