Coronavirus Update in India: भारतात मागील 24 तासांत आढळले 66,999 कोरोनाचे नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 23,96,638 वर
Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: हैदोस घातला असून दिवसागणिक वाढत जाणारी रुग्णांची संख्या देशातील बिकट स्थिती दर्शवत आहे. भारत केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 66,999 कोरोना रुग्ण आढळले असून 942 रुग्ण दगावले आहेत. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 23,96,638 वर पोहोचली असून 47,033 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशात सद्य घडीला 6,53,622 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 16,95,982 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन कोरोनाला हरवले आहे.

भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात असून आतापर्यंत राज्यात 5,48,313 रुग्ण आढळले असून मृतांची संख्या 18,650 वर पोहोचली आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग नियंत्रणासाठी प्रभावी लस (Coronavirus Vaccine) बनवल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी स्वत:च ही माहिती दिली. रशियात बनलेली कोरोना व्हायरस लस पहिल्यांदा आपल्या मुलीला देण्यात आल्याचेही पुतिन यांनी म्हटले आहे. ही लस घेतल्यानंतर कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढते, असे रशियाने म्हटले आहे. एएफपी नावाच्या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.