Budget Session 2019: 31 जानेवारीपासून अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात
Last full-year Budget presented by FM Jaitley under the current tenure of the Govt (Image: PTI/File)

Budget Session 2019: संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु होणार असून 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर अंतरिम बजेट (Interim Budget) 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होईल, असा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीच्या समितीत घेण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) 2019-20 या आर्थिक वर्षाचे बजेट सादर करतील. लोकसभा निवडणूकीपूर्वी मोदी सरकारच्या अधिपत्याखाली सादर होणारे हे शेवटचे बजेट असेल. मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट; जाणून घ्या काय असेल अर्थसंकल्पाचे वैशिष्ठ्य

अर्थ मंत्रायलयानुसार, 2019-20 साठी अंतरिम बजेट तयार करण्याचे काम सुरु आहे. 21 सप्टेंबर 2016 मध्ये सरकारने 92 वर्षांची प्रथा मोडत रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्र केले. त्यामुळे 2019 मध्ये देखील रेल्वे बजेट हा सामान्य अर्थसंकल्पाचाच एक भाग असणार आहे. 2018 मध्ये अर्थसंकल्प अधिवेशन 6 एप्रिलला संपले होते.

संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये लोकसभा अर्थसंकल्पीय सत्रात उत्पादकता 134 % होती आणि राज्यसभेच्या सत्र सत्राच्या पहिल्या भागांत 96% उत्पादकता होती. पहिल्या सत्रात लोकसभेत 7 तर राज्यसभेत 8 बैठका झाल्या होत्या.