Kalyan Building Collapse | (Photo Credit- X)

Wall Collapse Death: मान्सूनपूर्व पाऊस दमदार हजेरी लावत असल्याने अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. ठाणे (Thane Building Collapse) जिल्ह्यातील कल्याण शहरात इमारत कोसळून (Kalyan Building Collapse) घडलेल्या दुर्घटनेत एक जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काहींची स्थिती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर काही विश्वासार्ह हँडल्सनी व्हिडिओ शेअर करत दिलेल्या माहितीमध्ये या दुर्घटनेत 6 जण ठार तर इतर सहा जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील मंगलाराघो नगर भागात असलेल्या सप्तशृंगी या चार मजली इमारतीत हा अपघात झाला. इमारतीचा काही भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

चार जण इमारतीत अडकले

ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (20 मे) दुपारी 2.55 वाजता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने अनेक रहिवासी इमारतीत अडकले. बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चार जणांना वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. कोसळल्याची माहिती मिळताच ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) ला बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे, असे आपत्कालीन मदत पथकाचे देखरेख करणारे वरिष्ठ अधिकारी यासिन तडवी म्हणाले. (हेही वाचा, Waterlogging at Pune Airport: अवघ्या एक तासाच्या मुसळधार पावसामुळे पुणे विमानतळावर साचले पाणी; प्रवाशांची तारांबळ, वाहतूक विस्कळीत, ड्रेनेज व्यवस्थेवर प्रश्न (Videos))

पुण्यातही पावसाची बरसात

पुणे जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. अवघा तासभर पडलेल्या पावसामुळे पुण्यातील विमानतळावर पाणी साचले. ज्यामुळे विमानांच्या वाहतुकीत अडथळा आला. इतकेच नव्हे तर, शहरांमध्येही सकल भागात पाणी साजल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पाऊस कमी झाल्यावर सकल भागातील पाण्याचाही निचरा झाला आणि वाहतूक पूर्ववत होण्यास मदत झाली. (हेही वाचा: Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश)

काही भाग कोसळलेल्या ईमारतीचा व्हिडिओ

बंगळुरूमध्ये सोमवारी झालेल्या एका वेगळ्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. शहरात सुरू असलेल्या अविरत पावसामुळे इमारीतीची भिंत कोसळल्याने एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत बेंगळुरूमध्ये सुमारे 104 मिमी पाऊस पडला, ज्यामुळे गंभीर पाणी साचले, सखल भागात पाणी साचले आणि अनेक झोनमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली.

कल्याणमधील इमारत कोसळणे आणि बेंगळुरूमधील भिंत कोसळणे या दोन्ही घटना भारतीय शहरांमध्ये, विशेषतः पावसाळ्यात, निर्माण होणाऱ्या आपत्तीबाबत संकेत देतात. अशा घटना शहरांमध्ये पुरेशी आपत्ती व्यपस्थापन तयारी आणि चांगल्या नागरी पायाभूत सुविधांची तातडीची गरज अधोरेखित करतात.