
Terror Hideout Busted in J-K's Poonch: जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा आणखी एक अड्डा उद्ध्वस्त (Terrorist Hideout Destroyed in Poonch) केला आहे. जिल्ह्यातील सुरणकोट सेक्टरमधील हरी मारोटे गावात सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा हा अड्डा सापडला. रविवारी रात्री उशिरा लष्कर, पोलिस आणि एसओजीसह सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांच्या या अड्ड्यातून पाच आयईडी, वायरलेस सेट आणि काही कपडे जप्त करण्यात आले.
राष्ट्रीय रायफल्स (आरआर), भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडो युनिट्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेदरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक अत्याधुनिक 'फॉक्स होल' (लपण्याचा अड्डा) सापडला. या 'फॉक्स होल'ची रचना आणि त्यात लपवून ठेवलेल्या शस्त्रांनी सुरक्षा संस्थांना धक्का बसला. सुमारे सहा फूट खोल आणि आठ फूट रुंद असलेल्या या भूमिगत खड्ड्यात दहशतवाद्यांनी दीर्घकाळ लपण्याची व्यवस्था केली होती. येथे दहशतवाद्यांनी गॅस सिलेंडर, सौर दिवे, शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू लपवून ठेवल्या होत्या. (हेही वाचा - India Stops Chenab River Water: पाकिस्तानला आणखी एक धक्का; भारताने बगलिहार धरणातून थांबवले चिनाब नदीचे पाणी)
जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त -
Jammu & Kashmir | Hideout busted in Hari Marote village in Surankot sector of Poonch district with recovery of five IEDs, say Poonch Police
(Source: Poonch Police) pic.twitter.com/HO36EbKPza
— ANI (@ANI) May 5, 2025
यापूर्वी, बांदीपोरा पोलिसांनी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित ओव्हर ग्राउंड वर्कर्स (ओजीडब्ल्यू) च्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता आणि चार संशयितांना अटक केली होती. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की लष्कर-ए-तोयबाचे काही OGW त्यांच्या पाकिस्तानी हँडलर्सच्या सूचनेनुसार पोलिस, सुरक्षा दल आणि बाहेरील नागरिकांना लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत.
दरम्यान, या माहितीच्या आधारे, बांदीपोरा पोलिसांनी परिसरात विशेष चौक्या उभारल्या आणि शोध मोहीम सुरू केली. पोलीस, डी-कोय 45 बटालियन सीआरपीएफ आणि 13 आरआरच्या ई-कोय यांनी संयुक्तपणे कानिपोरा नैदखाई सुंबल परिसरात एक चेक पोस्ट उभारले. तपासणी दरम्यान, मोहम्मद रफिक खांडे आणि मुख्तार अहमद दार या दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या झडतीदरम्यान, त्यांच्याकडून दोन चिनी हँडग्रेनेड, एक 7.62 मिमी मॅगझिन आणि 7.62 मिमी जिवंत काडतुसांचे 30 राउंड जप्त करण्यात आले.