Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू काश्मीर च्या बारामुल्ला भागात दहशतवाद्यांंचा हल्ला, एक पोलिस आणि दोन CRPF जवान शहीद
Indian Army | (File photo)

स्वातंत्र्य दिनाच्या (Indian Independence Day 2020)  दोन दिवस नंतर लगेचच जम्मु- काश्मीर (Jammu- Kashmir) मधील बारामुल्ला (Baramulla) या भागात पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांंनी (Pakistani Terrorist) हल्ला केला आहे. दुर्दैवाने या हल्ल्यात भारतीय सैन्याचे दोन जवान आणि एक पोलिस अधिकारी शहीद झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, एलईटीने हा हल्ला केला आहे. चेकपोस्टवर गोळीबारानंतर 3 दहशतवादी फरार झाले. बारामुल्ला, जम्मू-काश्मीर मध्ये 1 पोलिस आणि 2 सीआरपीएफ जवानांना आपला जीव गमावला.अशी माहिती आयजी काश्मीर विजय कुमार (Vijay Kumar)  यांनी दिली आहे. 17 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार, गोळीबारात काही सुरक्षा रक्षकांना गंभीर इजा झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लातील क्रिरी भागात ही घटना घडली आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांंना पकडण्यासाठी या भागात शोधमोहिम राबवली जात आहे.

ANI ट्विट

यापुर्वी शुक्रवारी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी श्रीनगरच्या बाहेरील भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ज्यात नवगाम भागात दोन पोलीस दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. तर एकजण जखमी झाला होता.