Tejaswini | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

हैदराबाद (Hyderabad) येथील एका 27 वर्षीय तरुणीची लंडन (London) येथे हत्या झाली आहे. ही हत्या तिच्या ब्राझिलियन फ्लॅटमेटने (Brazilian flatmate) चाकून भोसकून केली आहे. तेजस्विनी रेड्डी (Tejaswini Reddy) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. सुरुवातीला तिची ओळख कोंथम तेजस्विनी (Kontham Tejaswini) अशी सांगण्यात येत होती. ती लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी 10 वाजणेच्या सुमारास तिच्या निवासी मालमत्तेवर हल्ला करण्यात आला. ज्यात तिची हत्या झाली. दरम्यान, महानगर पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकास अटक कल्याचे समजते. ताज्या माहितीनुसार या हत्या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी (Metropolitan Police) सांगितले की, घटनास्थळावरुन आणखी एका महिलेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. ही महिलाही 28 वर्षीयच आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिची प्रकृती सुधारली आहे. आता तिच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही घटना ही घटना नील्ड क्रिसेंट, वेम्बली येथे घडली. (हेही वाचा, Nigeria: उत्तर नायजेरियात लग्न समारंभ आटोपून परतत असताना बोट उलटल्याने 103 जणांचा मृत्यू)

एनडीटीव्हीने हैदराबाद पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ब्राझीलचा आरोपी हा अंमली पदार्थांचा व्यसनी असल्याची प्राथमिक माहती आहे. ज्याने तेजस्विनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आणि तिने नकार दिल्यावर तिच्यावर वार केला. तेजस्वीनी हिच्या हैदराबाद येथील चुलत भावाने सांगितले की, संशयीत आरोपी हा तेजस्वीनीच्या निवासस्थानी गेला होता. तेजस्वीनी ही तिथे तिच्या मैत्रिणींसोबत राहात होती. त्या ठिकाणी आरोपी तिथे गेला आणि त्याने तेजस्वीनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला नकार दिल्यानंतर त्याने वार केले. दरम्यान, तेजस्वीनी ही तीन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी एक आठवड्यापूर्वची लंडनला गेल्याचेही त्याने सांगतिले.

ट्विट

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी तेजस्वीनी हिच्या पालकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आह की, युनायटेड किंगडममधून शिक्षण घेऊन परतल्यावर ती विवाह करणार होती. मात्र, तिच्या अशा अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे तिच्या पालकांनी म्हटले आहे. पालकांनी पुढे म्हटले आहे की, आम्हाला आज सकाळी घटनेची माहिती मिळाली. ही घटना कधी घडली हे आम्हाला माहित नाही. आम्हाला माहिती मिळाली की ती गंभीर आहे आणि रुग्णालयात आहे. तीन वर्षांपूर्वी ती लंडनला गेली होती आणि तिथं तिने एमएस कोर्स पूर्ण केला होता.