तेलुगू देशम पार्टी सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांना पूत्र नारा लोकेश यांच्यासोबत नजरकैद
Andhra Pradesh CM Chandrababu Naidu | File Image | (Photo Credits: PTI)

आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री, तेलुगू देशम पार्टी (Telugu Desam Party) सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) आणि नारा लोकेश (Nara Lokesh) यांना नजरकैद करण्यात आले आहे. चंद्रबाबू यांनी आपल्या पक्षाच्या (TDP) वतीने काढलेल्या 'चलो अटमाकुर' रॅलीला केंद्रस्थानी ठेऊन कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरुन आंध्र प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत काही ठिकाणी कलम 144 लागू केले आहे.

आंध्र प्रदेशातील विद्यमान जगन सरकारवर टीडीपेने राजकीय हिंसेचा आरोप करत रॅलीचे आयोजन केले होते. पोलिसांनी म्हटले आहे की, टीडीपीने या रॅलीचे आयोजन करताना कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नव्हती. तेलगु देशम पार्टीचे सर्वेसर्वा, आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे बुधवारी (11 सप्टेंबर 2019) सकाळी 8 वाजलेपासून उपोषणास बसणार होते. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात शौचालय घोटाळा; 900 'इज्जतघर' केवळ कागदावरच, जमीनीवर काहीच नाही)

एएनआय ट्विट

एएनआयट्विट

चंद्रबाबू हे स्वत: या रॅलीत सहभागी होणार असल्याने टीडीपीच्या असंख्य कार्यकर्तांनी गर्दी केली होती. मात्र, प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र येणार असल्याने पोलिसांनी वेळीच कारवाई केली. या कारवाईत टीडीपीचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.