Telangana News: तेलंगणातील मंचेरियाल (Telangana) जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून एका दलितासह (Dalit Man Tortured) दोन तरुणांना उलटे टांगून त्यांचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितांना केवळ उलटेच बांधले गेले नाही तर त्यांच्या खाली आगही पेटवण्यात आली आणि दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. हैदराबादपासून 300 किमी अंतरावर असलेल्या मंचेरियल जिल्ह्यातील मंदामरी येथे शुक्रवारी ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अत्याचाराला वाचा फुटली. एका शेळी-मेंढी प्रकल्पात काम करणाऱ्या तेजा (19) आणि त्याचा दलित मित्र किरण (30) यांना मालक आणि त्याच्या कुटुंबीयांनी शेडमध्ये पकडून उलटे बांधले. दोघांवरही बकऱ्या चोरल्याचा आरोप आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे 20 दिवसांपूर्वी शेडमधून एक शेळी व काही लोखंडी रॉड चोरीला गेले होते. प्रकल्प मालक कोमुराजुला रामुलु आणि त्याच्या कुटुंबीयांना तेज आणि त्याच्या मित्रावर संशय होता. त्यातून त्यांनी दोघांना पकडून शेडमध्ये आणले, उलटे बांधून बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी धुराने गुदमरण्यासाठी त्याखाली आग लावली. ज्याला आपण धुनी देणे म्हणतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजा राजूच्या मेंढी फार्ममध्ये काम करत होती. त्याची आई स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. पोलिसांनी राजू आणि त्याच्या कुटुंबीयांवर एससी, एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ट्विट
Remember how #KCR promised of making a Dalit CM in #Telangana!
Meanwhile the reality is that the atrocities upon Dalits are increasing under his regime and no liberal opens their mouth as its a non-BJP ruled state.
In a troubling incident in Mandamarri, Telangana, two young… pic.twitter.com/l3RMuxmlHN
— Mitta Vamsi Krishna (@MittaVamsiBJP) September 3, 2023
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या आपल्या देशात आजही मोठ्या प्रमाणावर जातीयता मानली जाते. देशभरातील अनेक राज्यातून दररोज कोठे ना कोठे दलितांवर अत्याचार घडल्याच्या घटना, बातम्या येत असतात. जातीयता संपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आणि बदल होऊनही अशा प्रकारच्या घटना घडतात त्यामुळे सामाजिक वर्तुळातून अभ्यासक मोठ्या प्रमामावर चिंता व्यक्त करतात. सरकारही आपापल्या परिने मोठ्या प्रमाणावर प्रत्न करताना दिसते. तरीही या घटना घडत असतात. ज्यामुळे समाजमन मोठ्या प्रमाणावर दुखावले जाते.