Sex | Representational Image | (Photo Credit: PTI)

भारतीय संस्कृतीमध्ये ‘गुरु’ला एक विशेष स्थान आहे. मातीच्या गोळ्याला एक आकार देऊन त्याला घडवण्याचे काम गुरु करतो. मात्र तामिळनाडू (Tamilnadu) येथून गुरु-शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील एका शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा ग्रुप सेक्स व्हिडिओ समोर आले आहे. हा व्हिडिओ शिक्षिकेच्या कथित प्रियकराने बनवला आहे. अनेक ठिकाणी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तामिळनाडू सायबर सेल सक्रिय झाला असून याबाबत तपास सुरु आहे.

या ग्रुप सेक्स व्हिडीओचा तपास करणाऱ्या मदुराई पोलिसांनी सांगितले की, या व्हिडिओशी संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर असे व्हिडीओ आंतरराष्ट्रीय टोळीसाठी बनवले जात होते की स्थानिक पातळीवर याची सक्रियता होती, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी मदुराई येथील सरकारी शाळेतील 42 वर्षीय शिक्षिका आणि तिच्या 39 वर्षीय प्रियकराला रविवारी अटक करण्यात आली. या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवून त्यांची चौकशी सुरू आहे.

मदुराई सायबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीजीपी कार्यालयाकडून अश्लील कंटेंट शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पतीपासून विभक्त झाल्यानंतर शिक्षिका 2010 पासून तिच्या व्यावसायिक बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती. शिक्षिकेचे प्रियकराशी संबंध असण्यासोबतच तिच्या शाळेतील किशोरवयीन विद्यार्थ्यांशीही वेगवेगळे संबंध होते. ती शाळेत शिकणाऱ्या 15-16 वर्षांच्या तरुणांना घरी घेऊन यायची आणि त्यांच्याशी संबंध ठेवायची. कधी-कधी ती अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेऊन यायची आणि घरात त्यांच्याशी सामुहिक संबंध ठेवायची.

सांगितले जात आहे की, शाळेतील तीन किशोरवयीन मुलांसोबत शिक्षकाच्या संबंधांचा व्हिडिओ यापूर्वी शेअर करण्यात आला होता. यानंतर पोलीस सक्रिय झाले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, प्रियकराने उघड केले की त्याने हे व्हिडिओ त्याच्या काही मित्रांमध्ये शेअर केले होते. यामुळे सायबर सेलने या व्हिडिओ प्राप्त झालेल्या काही लोकांची चौकशी केली. (हेही वाचा: Crime: 29 वर्षीय महिलेवर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने केला बलात्कार, आरोपीचा शोध सुरू)

तक्रारीनंतर मदुराई साऊथ ऑल वूमन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिका आणि तिच्या प्रियकराविरुद्ध कलम 5(1), 5(एन) आर/डब्ल्यू 6, आयपीसी कलम 292(ए), 506 आणि आयटी कलम 67 (ए) आणि 67 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, अश्लील साहित्य प्रसारित करणे तसेच गुन्हेगारी धमकी देणे असे या दोघांवर आरोप आहेत.