Lock Down मध्ये दारू न मिळाल्याच्या नैराश्यात 46 वर्षीय इसमाची विहिरीत मारली उडी, पुढे काय झाले जाणून घ्या..
Hangover (Photo Credit: PIxabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी एकमेकांच्या संपर्कात न येणे हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी देशभरात स्वतः पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉक डाऊन (Lock Down) जाहीर केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले गेलेत. यामुळे तळीरामांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. दारू अभावी झालेली  हे महाभाग काही ना काही मार्गाने आपलं व्यसन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. असाच प्रयत्न तामिळनाडू मधील मनवलयन या 46 वर्षीय व्यक्तीने सुद्धा केला. मनवलयन याने चक्क दारू मिळवण्याचा हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी घराजवळच्या विहिरीतच उडी घेतली. आणि दारू द्या नाहीतर मी बाहेर येणारच नाही असे सांगू लागला,  शेवटी त्याला दारू देतो असे आश्वासन देण्यात आले आणि मग हा व्यक्ती विहिरीच्या बाहेर आला. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.. Coronavirus Lock Down: लॉक डाऊन काळातही मद्यपींना पुरवणार दारू! 'या' कारणास्तव केरळ सरकारने घेतला मोठा निर्णय

मनवलयन हा 46 वर्षीय व्यक्ती हा तामिळनाडू मधील पट्टाभिराम येथील रहिवासी आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. या बंदीच्या काळात दारू मिळत नसल्याने त्याने आपल्या पत्नीसोबत शेजाऱ्यांशी देखील भांडणे केली होती. दारू न मिळाल्याने मनावलयन सतत चिडचिड करत होता. याच रागात त्याने विहिरीत उडी घेतली आणि बराच वेळ तसाच विहिरीत बसून राहिला.दारू दिल्याशिवाय मी बाहेर येणार नाही असा हट्ट तो करू लागला. शेवटी अधिकाऱ्यांनी त्याला दारू देण्याचे आश्वासन दिले.तेव्हा तो बाहेर आला. आश्चर्य म्हणजे मनवलयन याने ज्या विहिरीत उडी मारली ती विहीर २५ फुट खोल होती तरीही त्याचा जीव वाचला.

दरम्यान, यापूर्वी केरळ सरकारने दारूची होम डिलिव्हरी केली जाईल असा निर्णय घेतला होता. केरळात २ जणांनी दारी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी असे निर्देश दिले होते.