कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lock Down) दरम्यान व्यसनी मंडळींची चांगलीच पंचाईत होतेय. केरळ मध्ये तर दारू मिळत नाही म्ह्णून मानसिक नैराश्य आलेल्या पाच जणांनी मागील आठवड्यात आत्महत्या केल्याचे समजत आहे, तर तब्बल 25 जणांची स्थिती बिघडल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर केरळ सरकारने (Kerala Government) एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दारू सोडताच येणार नाही अशा स्थितीत म्हणजेच विथड्रॉव्हल सिन्ड्रोम (Wuthdrwal Syndrome) असणाऱ्या मद्यपींना डॉक्टरांच्या परवानगीनुसार दारू पुरवण्याचा निर्णय केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Pinnarai Vijayan) यांच्या सरकारने घेतला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विथड्रॉव्हल सिन्ड्रोम असणाऱ्या मद्यपाईंना यापुढे किमान दारू पुरवण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्या डॉक्टरांची परवानगी असणारी चिठ्ठी आवश्यक असेल. यासाठी मद्य उत्पादन विभागला शक्य असणारे मार्ग सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात सद्य घडीला तब्ब्ल 1.6 मिलियन म्हणजेच 16 लाख नियमित दारू घेणारे नागरिक आहेत यातील 45 टक्के मद्यपी हे अति मद्यपान करणारे आहेत ज्यांना दारू न मिळाल्यास शारीरिक त्रास व मानसिक नैराश्य जाणवू शकते. Lockdown काळात दारूची दुकाने सुरु ठेवा! या मागणीच्या ट्विट मुळे ऋषी कपूर वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान, संबंधित मद्यपींच्या बाबत मानसोपचार तज्ञांनी माहिती देताना त्यांना किमान दारू पुरवण्यात यावी असा सल्ला दिला होता, मात्र दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्णयानुसार तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनेच्या अन्वये राज्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या निर्णयानंतर लॉक डाऊन काळात मद्यपींना नक्की कशा प्रकारे दारू पुरवली जावी हा प्रश्न केरळ सरकारच्या समोर आहे.