Tamil Nadu Assembly Election 2020: नवे पॅकींग जुना चेहरा, AIADMK पक्षाकडून तामिळनाडू विधानसभा 2021 लढण्यासाठी मुख्यमंत्री पादाचे नाव घोषीत
AIADMK Leader | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या निधनानंतर एआयएडीएमके (AIADMK) पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकील सामेरे जात आहे. तामिळानाडू विधानसभा निवडणूक 2020 (Tamil Nadu Assembly Election 2020) डोळ्यासमोर ठेऊन अन्नाद्रमुक (AIADMK) पक्षाने मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून, नुकतीच एक मोठी घोषणाही केली. या घोषणेनुसार आगामी विधानसभा निवडणूक अन्नाद्रमुक मुख्यमंत्री ई पलानीस्वामी ( E Palaniswami ) यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. तर उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम (O. Panneerselvam) हे पक्ष संघटनेचे काम पाहणार आहेत. ओ पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख्याने पलानीस्वामी यांचे प्रतीस्पर्धी म्हणून ओळखले जात होते. परंतू, अनेक चर्चा, अफवा आणि राजकीय खलबतं यानंतर पक्षाने अंतिम घोषणा केली आहे.

पक्षाच्या निर्णयाबाबत पनीरसेल्वम यांनी घोषणा करत सांगिले की, पक्षाची 11 सदस्यीय स्टीयरींग कमेटी पक्षाचे सामूहीक नेतृत्व करेन. या वेली ओपपीएस ( ओ पनीरसेल्वम) यांनी पक्षाच्या संस्थापक जयललिता यांच्या स्मृतिंना उजाळा दिला. जयललिता यांचे 2016 मध्ये निधन झाले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ई पलानीस्वामी (ईपीएस) आणि ओ पनीरसेल्वम (ओपीएस) यांच्यात रात्रभर चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 च्या दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये सत्तासमिकरणावर एकमत झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये गेले प्रदीर्घ काळ चर्चा सुरु होती. दोन्ही नेत्यांमध्ये नेतृत्व आणि सत्तावाटपावरुन संघर्ष सुरु असल्याचेही म्हटले जात होते. परंतू, दोन्ही नेत्यांनी अखेर चर्चेतून संघर्षावर तोडगा काढल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, AIADMK Dalit MLA A Prabhu Marriage With Brahmin Girl: अन्नाद्रमुक आमदार ए. प्रभु यांचे ब्राह्मण मुलीसोबत लग्न, जातीयतेला मुठमाती देत 'आंतरजातीय विवाह')

दरम्यान, जयलिता यांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळकल्या जाणाऱ्या व्ही. के. शशिकला (V. K. Sasikala) या सध्या तुरुंगात आहेत. बेहिशोबी मालमत्त जमवल्याप्रकरणी त्या दोषी आढलल्या आहेत. दरम्यान, शशिकला यांना तुरुंगातून बाहेर येण्यापूर्वी अन्नाद्रमुक पक्षातील दोन प्रमुख नेत्यांनी काडलेला तोडगा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शशिकला या जानेवारी (2021) मध्ये तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, शशिकला जानेवारीपूर्वीही तुरुंगाबाहेर येऊ शकतात.