माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निधनाच्या अवघ्या तीन तास आधी मानले होते नरेंद्र मोदी यांचे आभार
Sushma Swaraj (Photo Credits: PTI)

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री (External Affairs Minister) सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. मंगळवारी रात्री उशीरा स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास होत होता ज्या नंतर त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स (AIIMS)  रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी सुषमा स्वराज यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला स्वराज यांनी प्रतिसाद दिला नाही.अखेरीस त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. स्वराज यांच्या निधनानंतर त्यांचे तीन तास आधीचे एक ट्विट बरेच चर्चेत आहे. काल, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीर (Jammu & Kashmir) मधून कलम 370 (Article 370) हटवले होते ज्यावर आज विधेयक विभाजनाचा ठराव देखील लोकसभेत मंजूर झाला होता या निर्णयानंतर सुषमा यांनी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानत आपल्याला हा बहुप्रतीक्षित दिवस दाखवण्यासाठी धन्यवाद अशा आशयाचे ट्विट लिहिले होते.

सुषमा स्वराज ट्विट

दरम्यान सुष्मा यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2019 या काळात परराष्ट्र मंत्री म्हणून महत्वाचे भूमिका बजावली होती मात्र मागील काही महिन्यांपासून तब्येत जास्तच खालावली असल्याने यंदा त्यांनी निवडणूक लढवण्यापासून माघार घेतली होती तसेच यंदाच्या मोदी सरकारमध्ये त्यांनी आपल्याला मंत्रीपद न देण्याची विनंती केली होती. यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातूनही हात काढून घेतला होत अंतर सोशल साइट्सवरून त्या नेहमीच जनतेच्या संपर्कात असायच्या.

साहजिकच परराष्ट्र मंत्र्यांचे पद सांभाळणाऱ्या सुषमा यांच्यासाठी कलम ३७० हटवल्याचा निर्णय महत्वाचा होता, त्यामुळे आजही त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हे खास ट्विट केले होते. मात्र त्याच्या काहीच तासानंतर सुषमा यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.