Surgical Strike 2: भारतीय वायूसेनेकडून पाकिस्तानच्या रिकाम्या तळावर हल्ला-ओमर अब्दुला
Omar Abdullah (Photo Credits- Twitter)

Surgical Strike 2: भारतीय वायूसेनेने पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देत पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसुन दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला केला आहे. त्यामुळे ओमर अब्दुला (Omar Abdullah) यांनी भारतीय वायुसेनेचे कौतुक केलेच.पण ज्या तळांवर वायुसेनेकडून हल्ला करण्यात आला ते रिकामे आणि कार्यरत नसल्याचे म्हटले आहे.

अब्दुला यांनी ट्वीट करत असे म्हटले की, बालाकोट येथील दहशतवादी तळावर मोठा प्रतिकात्मक हल्ला केला आहे असे म्हटले खरे. मात्र पाकिस्तानची ही तळे कार्यरत नसल्याचा ही उल्लेख त्यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.(हेही वाचा-भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले; जैश-ए-मोहम्मदची कंट्रोल रुम उद्ध्वस्त)

भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांची कंट्रोल रुम उदद्ध्वस्त केली. रात्रीच्या अंधारात पहाटे 3 वाजता ही कारवाई केल्याचे वृत्त आहे.