Surgical Strike 2: मुंबई, पंजाब, गुजरात सीमेवर भारतीय वायुसेनेकडून हाय अलर्ट जाहीर
मुंबई, पंजाब, गुजरात सीमेवर भारतीय वायुसेनेकडून हाय अलर्ट जाहीर (Photo Credits-Twitter)

Surgical Strike 2: भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) पाकव्याप्त काश्मिवर केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे (Pakistan) धाबे दणाणले आहेत. तसेच भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात 200 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मात्र आता पंजाब (Punjab),मुंबई (Mumbai), गुजरात (Gujrat) सीमेवर भारतीय वायुसेनेकडून हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण गुजरात मध्ये पोलिसांकडून ही तेथील स्थानिकांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे.

अंबाला एअर बेस आणि मुंबई नवेल एअर बेसला ही हाय अलर्टचा इशारा देऊ केला आहे. त्याचसोबत वाघा बॉर्डवर कडक सैन्यसुरक्षा तैनात करण्यात आले असल्याचे एनडीटीव्ही ने सांगितले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) सकाळी या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती.त्याचसोबत पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच बुधवारी (27 फेब्रुवारी) रोजी अमरिंदर सिंह सीमावर्ती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.(हेही वाचा-Surgical Strike 2: भारतीय वायूसेनेकडून पाकिस्तानच्या रिकाम्या तळावर हल्ला-ओमर अब्दुला)

भारताने पाकिस्तानवर केलेल्या या हल्ल्याचे प्रतिउत्तर देत जैश-ए-मोहम्मदच्या बालकोट येथील मुख्य तळावर आज वायूसेनेने हल्ला केला. पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर वायुसेनेने एअर स्ट्राईक 5 दशकात पहिल्यांदाच केला आहे. यापूर्वी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानला भारतापुढे नतमस्तक करण्यास भाग पाडले होते.