महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) दरवाजे ठोठावलेल्या माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Ex-Mumbai CP Param Bir Singh) यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सुप्रिम कोर्टाने नकार देत त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) जाण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायलयाने परमबीर सिंह यांना 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ज्यांच्याविरूद्ध याचिका आहे ते प्रतिवादी का नाहीत? आणि ही याचिका Article 226 ऐवजी 32 मध्ये का दाखल करण्यात आली आहे? या दोन्ही प्रश्नांची अपेक्षित उत्तरं न मिळाल्याने अखेर त्यांना मुंबई हाय कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Mumbai Police Transfer: सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद, मुंबई पोलीस दलात बदलीची लाट; 65 पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी.
दरम्यान महाराष्ट्राचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली गृहरक्षक दलामध्ये करण्यात आली आहे. अनिल देशमुखांनी एका कार्यक्रमात बोलताना परमबीर सिंह यांच्याकडून काही अक्षम्य चूका झाल्याचं सांगण्यात आले आणि त्यामुळे त्यांची उचलबांगडी होत असल्याचं म्हटलं आहे. पण यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर पोलिस खात्यामध्ये सचिन वाझेंना बार, रेस्टॉरंट मध्ये छापेमारी करून 100 कोटी गोळा करण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीमधून सध्या राज्यात राजकारण देखील तापलं आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली होती. Anil Deshmukh On Param Bir Singh: न सांगता येण्यासारख्या चुका घडल्यानेच परम बीर सिंह यांच्यावर बदलीची कारवाई- अनिल देशमुख.
ANI Tweet
Supreme Court refuses to entertain the plea of former Mumbai Police chief Param Bir Singh seeking CBI investigation in the alleged corrupt malpractices of Anil Deshmukh, Home Minister of Government of Maharashtra and asks him to approach the High Court.
— ANI (@ANI) March 24, 2021
आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रकरणाची गंभीरता लक्षात तातडीने मुंबई सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी घ्यावं अशी मागणी केली आहे. दरम्यान परमबीर सिंह यांची बाजू कोर्टात माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी मांडत होते. आता गुरूवार (25 मार्च) दिवशी तातडीने बॉम्बे हाय कोर्टात सुनावणी व्हावी यामागणीसाठी आज परमबीर सिंह मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करणार आहेत.