Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

पुलवामा (Pulwama) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या भारत देशभरामध्ये संतापाची भावना आहे. यामध्ये काही अतिउत्साही तरूणांनी थेट कायदा हातामध्ये घेत देशभरात विविध ठिकाणी राहणार्‍या काश्मिरी तरूणांना मारहाण केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला संतापजनक असला तरीही अशाप्रकारे काश्मिरी तरूणांवर (Kashmiri students) हल्ले करणं चूकीचे असल्याने याविरूद्ध तरूणांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. आज या प्रकरणावर सुनावणी करताना  सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  केंद्र सरकार आणि देशातील 10 राज्यांना मारहाणींच्या घटनांबद्दल उत्तर देण्यास सांगितलं आहे. पाकिस्तानी गुप्तहेराला जयपूर कारागृहात कैद्यांकडून बेदम मारहाण; जागेवरच मृत्यू

 

महाराष्ट्रामध्येही यवतमाळ येथे काही काश्मिरी तरूणांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं वृत्त आहे. याप्रकराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडीयामध्ये व्हायरल झाली होती. यानंतर युवासेनेही कार्यकर्त्यांची ओळख  पटवून जर ते युवासेनेचे असतील तर त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल असं सांगत काश्मिरी तरूणांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. Pulwama Terror Attack: पुलवामा हल्ल्यानंतर लष्कारातील 111 जागांसाठी 2500 काश्मिरी तरुणांचे अर्ज

14 फेब्रुवारीच्या दुपारी सीआरपीएफच्या बसवर हल्ला करण्यात आला. यामध्ये 40 जवान जागीच ठार झाले तरया दहशतवादी घटनेनंतर पिंगलान येथे झालेल्या दहशतवादी विरूद्धच्या चकमकीत पाच भारतीय जवान ठार झाले आणि तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं. मात्र या प्रकारानंतर भारत- पाकिस्तानचे संबंध अधिक तणावग्रस्त झाले आहेत. भारतासह मुंबईमध्ये हायअलर्ट जाहीर करण्यता आला आहे.