Supreme Court | (Photo Credit: ANI)

दिल्लीसह भारत देशाला सुन्न करणार्‍या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा देण्याची मागणी वाढत आहेत. मात्र चारही आरोपी फाशी टाळण्यासाठी विविध मार्ग शोधत आहेत. दरम्यान या प्रकरणातील विनय कुमार याने आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगत फाशी देऊ नये अशी विनवणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून लावली आहे. . सर्वोच्च न्यायालयाने निकालाची सुनावणी करताना विनय हा मानसिकदृष्ट्या ठीक असल्याचे सांगितले आहे. काल (13 फेब्रुवारी) सुनावणीनंतर कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद कडून विनय शर्मा याची दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फाशी टाळण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

विनय कुमारच्या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण आणि ए. एस. बोपन्ना, न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने निर्णय दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आणि सोबतच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तुषार मेहता केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडत आहेत.

ANI Tweet

निर्भया बलात्कार प्रकरणी दोषी विनय शर्मा याच्या मानसिक स्थितीबाबत त्याच्या वकिलाकडून कोर्टात माहिती दिली. विनय हा मानसिकदृष्ट्या आजारी असून त्याच्यावर उपचारही सुरू आहेत असे त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. दरम्यान या वेळेस शत्रुघ्न चौहान यांच्या 2014 च्या निर्णयाचा हवाला देखील देण्यात आला. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या पीडित दोषीची फाशीची शिक्षा बदलण्यात आली पाहिजे असे चौहान प्रकरणात कोर्टाने म्हटले होते.