Masjid (Photo Credits-Twitter)

सुन्नी वफ्फ बोर्डाची (Sunni Waqf Board) सोमवारी एक महत्वूर्ण बैठक पार पडली. त्यामध्ये सरकारने अयोध्या प्रकरणी (Ayodhya Case) ऐतिहासिक निर्णयाची सुनावणी करत मस्जिदला पाच एकर जमीन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आजच्या बैठकीत सुन्नी वफ्फ बोर्डाने अयोध्येतील पाच एकर जमीन मान्य केली आहे. या जागेवर मस्जिदसह चॅरिटेबल ट्रस्टसुद्धा उभारण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत आठ पैकी दोन सदस्यांनी जमीनचा स्विकार करण्यास विरोध केला होता. त्यानंतर उर्वरित सदस्यांनी जमीन घेण्यास सहमिती दिली होती.

बैठकीनंतर सुन्नी वफ्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर फारुकी यांनी असे म्हटले की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार पाच एकर जमीन मस्जिद उभारण्यासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत मस्जिदीसाठी देण्यात आलेल्या जागेचा स्विकार करण्यात आला आहे. मस्जिदसोबत आता चॅरिटेबल ट्रस्टची उभारणी सुद्धा करण्यात येणार आहे. ट्रस्ट आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांबाबत संबंधित घोषणा प्रस्तावित ट्रस्टची स्थापन केल्यानंतर होणार आहे.(Ayodhya Verdict: अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक सुनावणी करणाऱ्या 'या' 5 न्यायाधिशांबाबत जाणून घ्या)

ANI Tweet:

परंतु वफ्फ बोर्डाचे सदस्य अब्दुल रज्जाक यांनी शरीयत मस्जिद ऐवजी पुन्हा जमीन घेण्याची परवानगी देत नाही. त्यामुळेच जमीन घेतली नाही पाहिजे आणि याचा म्हणूनच विरोध करत आहोत. दुसरे सदस्य इमरान माबूद खान यांनी बैठकीला बॉयकेट केले आहे. त्यांनी शरीयतचा हवाला देत बैठकीत न येण्याचे म्हटले आहे. उर्वरित सहा सदस्य हे चेअरमन सोबत आहेत. त्यामुळेच जमीन मान्य करण्याच्या निर्णयाला मान्यता मिळाली असून त्या ठिकाणी मस्जिद उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.