एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कारवाया सुरूच आहे. आज ( 4 मार्च ) राजस्थानातील बिकानेरमध्ये (Bikaner) भारताच्या सुखोई 30 (Sukhoi 30MKI) विमानाने पाकिस्तानचा एक ड्रोन पाडला आहे. एअर टू एअर झालेल्या लढाईमध्ये ड्रोनला वेळीच रोखण्यात भारताला यश आलं आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती ANI ने दिली आहे. IAF च्या एअर स्ट्राईकवर एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ यांचं वक्तव्य; 'किती दहशतवादी मारले यापेक्षा दिलेल्या लक्ष्यांचा वेध घेणं हे आमचं काम'
इंडियन एयरफोर्सच्या रडारवर पाकिस्तानातून ड्रोन येत असल्याची माहिती मिळताच भारतीय हवाई दल सज्ज झाले. सुखोई-30 एमकेआईद्वारा त्याचा बिमोड करण्यास भारतीय हवाई दलाला यश आले आहे.
Rajasthan: At 11:30 am today a Sukhoi 30MKI shot down a Pakistani drone at the Bikaner Nal sector area of the border. Drone was detected by Indian Air Defence radars pic.twitter.com/Ijc4B4XzjN
— ANI (@ANI) March 4, 2019
एकीकडे शांततेकडे एक पाऊल पुढे टाकत भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची ६० तासानंतर सुटका करण्यात आली. मात्र दुसरीकडे पाकिस्तानच्या भारतावर कुरघोडी सुरूच आहेत. २६ फेब्रुवारी दिवशी भारताने मिराज 2000 विमानाच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला. यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उडवण्यास भारताला यश आलं आहे.