IAF च्या एअर स्ट्राईकवर एअर चीफ मार्शल बीरेंद्र सिंग धनोआ यांचं  वक्तव्य; 'किती दहशतवादी मारले यापेक्षा दिलेल्या लक्ष्यांचा वेध घेणं हे आमचं काम'
Air Chief Marshal BS Dhanoa (Photo Credits: ANI)

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) भारतीय हवाई दलाने घुसून एअर स्ट्राईक केला. बालाकोट भागामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उडवण्यास यश आले आहे. दरम्यान पाकिस्तान आणि भारतामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. नुकताच पाकिस्तानमध्ये अडकलेला विंग कमांडर अभिनंदन भारतामध्ये परतला आहे. या साऱ्या घटनांवर आवाज हवाई दलाने अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यामध्ये किती दहशतवादी मारले गेले ते अभिनंदन पुन्हा विंग कमांडर म्हणून परतणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं एअर चीफ मार्शल  प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ  (Air Chief Marshal BS Dhanoa) यांच्याकडून देण्यात आली.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आम्ही किती लक्ष्य यशस्वीरित्या उडवली हे पाहतो, किती दहशतवादी मारले हे आमचं काम नाही असं म्हणतं मिशन अजून संपलं नसल्याचं म्हटलं आहे. एअर स्ट्राईक केल्यानंतर शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचा कांगावा पाकिस्तानकडून करण्यात आला. त्यावर उत्तर देताना एअर चीफ मार्शल  बीरेंद्र सिंग धनोआ म्हणाले,'जर आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले मग पाकिस्तानी पंतप्रधानांनी प्रत्युत्तर का दिले? विंग कमांडर अभिनंदन पुन्हा लढाऊ विमान चालवणार? वायुसेना प्रमुखांनी दिले उत्तर

 

भारतामध्ये परतलेल्या हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन यांच्या प्रकृतीबद्दलही त्यांनी माहिती दिली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मेडिकल टेस्ट झाल्यानंतर तो पुन्हा हवाई दलामध्ये सहभागी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.