Cyclone Fani: वादळामुळे गोंधळून जाऊ नका, सुदर्शन पट्टनाईक यांनी वाळूशिल्पातून दिला संदेश
Cyclone Fani Sand Art Made By Sudarsan Pattanaik At puri, Odisha(Photo Credits: Twitter/Sudarsan Pattnaik)

Sudarsan Pattnaik Sand Art At Puri: दक्षिणेकडील राज्यांमध्ये (Southern States) हाहाकार माजवत असलेल्या फनी (cyclone Fani) वादळामुळे सगळीकडे गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावत असलेलं हे वादळ काल ओडिशाच्या किनारपट्टीवर दाखल झाले, या वादळासोबत आलेलं भीतीचं सावट दूर करण्यासाठी आणि त्रस्त लोकांना आधार देण्याच्या हेतूने अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर पद्मश्री विजेते सुदर्शन पट्टनाइक (Sudarshan PAttnaik)  यांनी ओडिशा (Odisha) मधील पुरी (Puri)  इथल्या समुद्र किनाऱ्यावर एक वाळूचे शिल्प साकारले होते. या शिल्पकृती सोबतच फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करत त्यांनी ओडिशा मधील नागरिकांना शांत व संयमी राहण्याचा सल्ला दिला आहे.

सुदर्शन पटनाईक ट्विट

हे शिल्प ओडिशा मध्ये हे वादळ येऊन धावण्याच्या आधी तयार करण्यात आले होते. यामध्ये भगवान जगन्नाथ आपल्या सर्वांचे रक्षण करेल असा विश्वास दर्शवत जगन्नाथाची वाळूची मूर्ती सुदर्शन यांनी साकारली होती, मात्र समुद्र किनाऱ्यावर जोरदार वारे वाहत असल्याने ही वाळू उडून जाऊन लागली, मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील सुदर्शन यांनी किनाऱ्यावर एक डोळा व त्याच्या आसपास घोंगावणारे वादळ असे वाळू शिल्प साकारत त्याखाली गोंधळून जाऊ नका व या फनी वादळापासून सुरक्षित राहा असा संदेश लिहिला होता, असे त्यांनी आज तक ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. Fani Cyclone च्या तडाख्यात भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर जन्मलेल्या मुलीचे नाव ठेवले 'फनी'

यापूर्वी अनेकदा ओडिशा मधील समुद्र किनाऱ्यांवर वादळ आलं आहे, मात्र फनी वादळाची तीव्रता इतकी प्रचंड आहे यामुळे ओडिशात 8 लोकांचे बळी गेले व प्रचंड नुकसान झाले. आता हे वादळ शनिवारी पश्चिम बंगालमध्ये धडकेल .Cyclone Fani Updates: ओडीशा राज्यात 2 बळी घेऊन फनी वादळ पश्चिम बंगालच्या सरकले

पश्चिम बंगालमध्ये या वादळाचा वेग ताशी 90 किलोमीटरच्या इतका आहे. पश्चिम बंगाल मध्येही समुद्रकिनाऱ्याजवळील भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.