Cyclone Fani Updates: ओडीशा राज्यात 2 बळी घेऊन फनी वादळ पश्चिम बंगालच्या सरकले
Cyclone Fani| (Photo Credits: ANI)

Cyclone Fani Updates: फनी चक्रीवादळ शुक्रवारी ओडीशा राज्यात पोहोचले. शुक्रवारी (3 एप्रील 2019) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास Cyclone Fani ओडीशा किनारपट्टीवर धडकले. प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावत असलेल्या या वादळाने ओडीशात पोहोचताच दोन नागरिकांचा बळी घेतला. या वादळाचा परिणाम कोलकाता-चेन्नई मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे सेवेवरही झाला आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या 220 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. हवामान विभागाच्या हवाल्याने वृत्त देताना प्रसारमाध्यमांनी Cyclone Fani चे संकट कायम असले तरी, धोका बऱ्याच अंश टळला आहे.

वादळाच्या तडाखा बसलेल्या अनेक ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तर, अनेक झोपड्या आणि झाडे कोसळली आहेत. काही झोपड्या पाण्याखाली गेल्या आहेत. या वादळाने दोन नागरिकांचा बळी घेतल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र, काही लोक या वादळात तीन लोकांचा बळी गेल्याचे सांगत आहेत. वादळाचे संभाव्य संकट ध्यानात घेऊन सुमारे 12 लाख लोकांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. वादळाने झालेल्या नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप पुढे आला नाही.

दरम्यान, आनंदाची बातमी अशी की, वादळाचा जोर बऱ्याच अंशी कमी आला आहे. Cyclone Fani वादळामुळे स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या सेवेसाठी ओडीसा सरकारने तब्बल 900 छावण्या उभारल्या आहेत. तर, सुरक्षा दलालाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, पुढील सूचना मिळे पर्यंत राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (हेही वाचा, Fani Cyclone: 'ओडिशा' ला धडकणारं चक्रीवादळ 'फनी' याचं नावं कसं ठरलं? त्याचा नेमका अर्थ काय?)

एएनआय ट्विट

आपत्तीदरम्यान सेवा पुरवणारी ओडीसा सरकारचा विभाग आवश्यक त्या सर्व यंत्रसामग्रीने तयार आहे. शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर 6-6 सदस्यांचे एक अशी एकूण 50 पथकं तैनात करण्यात आली आहेत.