ज्येष्ठ भाजप (BJP) नेते खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी (Subramanian Swamy) हे अनेकदा केंद्र सरकारवर टीका करतात. स्वामी यांनी आजही (बुधवार, 10 मर्च) अशाच अशाच प्रकारचे एक ट्विट करत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना सल्ला दिला आहे. तसेच, केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्याचा सामना करण्याची वेळ आली आहे. त्यांनी QUAD आणि BRICS यापैकी एकाची निवड करायला हवी. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मोदी आपल्या सत्यतेच्या क्षणांपर्यंत पोहोचले आहेत. भारताच्या विश्वगुरु होण्याच्या दाव्यातील हवा निघाली आहे. आता मोदींनी QUAD आणि BRICS यापैकी एकाची निवड करायला हवी. '
सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या ट्विटवर लगेचच काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यापैकी विनीत नावाच्या एका यूजरने म्हटले आहे की, 'ते आगोदरच QUAD सोबत बैठक घेत आहेत. ' या ट्वटला प्रतिक्रिया देत स्वामी यांनी म्हटले की, 'आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या रुपात शी यांच्यासोबत नवी दिल्ली येथे ब्रिक्ससोबत बैठक' (हेही वाचा, Ram Mandir: 'राम मंदिरामध्ये राजीव गांधी यांचे योगदान, नरेंद्र मोदी यांनी काहीही केले नाही' भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याकडून घरचा आहेर)
Modi has reached his moment of truth. All the spin about India being a world leader has been punctured. Today Modi must choose between QUAD and BRICS. Or end up as a Bat in Panchatantra
— Subramanian Swamy (@Swamy39) March 9, 2021
भारत,अमेरिका, जापान आणि ऑस्टेलिया यांचा समूह Quad ची एएक व्हर्चुअल बैठक शुक्रवारी पार पडत आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. Quad च्या या बैठकीला चारही देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काही खास निर्णय होतो का याबाबत उत्सुकता आहे.
प्राप्त माहितीनुसार, चाहही देशांचे राष्ट्रप्रमुख हे परस्पर हितसंबंध आणि इतर काही जागतीक मुद्द्यांवर चर्चा करतील. इतरही काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल अशी आपेक्षा आहे.