प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

हरियाणा (Haryana) येथे दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परिक्षेच्या उत्तर पत्रिकेत उत्तरांऐवजी शायरी लिहिली असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे तेथील शिक्षक हैराण झाले असून विद्यार्थ्यांची कोणत्या शब्दात कानउघडणी करावी याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

बोर्डाची परिक्षा राज्यात संपली असून 3 एप्रिल पासून पेपर तपासणीसाठी सुरुवात झाली आहे. परंतु भरपूर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. त्याऐवजी चित्रपटातील गाणी, शायरी आणि पास करण्याचे आवाहन उत्तरपत्रिकेतून केले आहे. त्यामुळे शिक्षकांना अशा विद्यार्थ्यांना कोणत्या आधारावर गुण द्यावे याबद्दलचा प्रश्न उपस्थित होत आहे.(हेही वाचा-बोर्डाच्या परिक्षेत पास कराल तर लग्न होईल, विद्यार्थिनीची उत्तर प्रत्रिकेतून शिक्षकाला विनवणी)

तसेच काही दिवसांपूर्वीसुद्धा एका विद्यार्थिनीने बोर्डाच्या परिक्षेत पास करा तरच लग्न होईल अशी गळ उत्तरपत्रिकेत लिहिली होती. अशा पद्धतीचे प्रकार सध्या बोर्डाच्या परिक्षेत दिसून येत असल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.