SpiceJet वर Ransomware Attack; सकाळच्या सत्रातील विमानांचं टेक ऑफ उशिराने!
SpiceJet | (Photo Credits: Twitter/ANI)

स्पाईसजेट (SpiceJet) विमान कंपनीच्या विमानसेवेचा आज सकाळी गोंधळ उडाला होता. काही वेळापूर्वी स्पाईसजेटने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार विमान कंपनीच्या सिस्टीमवर रॅन्सम्वेअरचा हल्ला (Ransomware Attack) झाला आहे. यामुळे सकाळी अनेक विमानांच्या उड्डाणांवर त्यांचा परिणाम झाला आहे. दरम्यान कंपनीच्या आयटी विभागाकडून यावर तोडगा काढत सेवा सुरळीत केली आहे.

रॅन्समवेअरच्या माध्यमातून हॅकर्स काही व्हायरस संगणकात सोडतात. या द्वारा संगणकातील डाटा वापरणं बंद होतं. स्क्रिनवर एज लिंक येते. या लिंकद्वारा पैशांची मागणी केली जाते आणि ते पैसे देणं भाग असतं. ते न दिल्यास हॅकर तुमचा डाटा हॅक करू शकतो.

प्रवाशांची ट्विट्स

स्पाईसजेटच्या या तांत्रिक घोळामुळे फ्लाईट्स अंदाजे 2-4 तास उशिराने टेक ऑफ झाली आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना फटका बसला आहे. सकाळच्या सत्रात अनेक विमानांचं टेक ऑफ वेळेत होऊ न शकल्याने काहींनी आपली नाराजी सोशल मीडीयाच्या माध्यमातूनही व्यक्त केला आहे.