Sonia Gandhi | (Photo Credits-ANI)

रायपूर (Congress Raipur session) येथे सुरु असलेल्या काँग्रेस पक्षाच्या 85 व्या पूर्णवेळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी संबोधीत केले. या वेळी त्यांनी 'भारत जोडो यात्रे'चे जोरदार स्वागत केले. या स्वागतासोबतच त्यांनी हा माझ्या आयुष्यातील आणि काँग्रेसच्याही सर्वात वळणदार क्षण असेल असे सांगितले. या भाषणात त्यांनी पुढे 2004 आणि 2009 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मिळालेल्या विजयांनी मला वैयक्तिक समाधान दिले, पण भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) पाहून मला सर्वात जास्त समाधान मिळाले. हाच माझ्या आयुष्यातील निर्णायक क्षण असल्याचे सांगत त्यांनी राजकीय निवृत्तीचे (Sonia Gandhi On Political Retirement) संकेत दिले.

पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना सोनिया गांधी यांनी सांगितले की, काँग्रेस आणि संपूर्ण देशासाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक आहे. भाजप-आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था काबीज करून उद्ध्वस्त केली आहे. काही उद्योगपतींच्या सहाय्याने आर्थिक विध्वंस घडवून आणला आहे. अशा काळात काँग्रेसची जबाबदारी अधिक वाढली आहे असे उद्गार काँग्रेस खासदार आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायपूर, छत्तीसगड येथे सांगितले. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी लॉन्च झाल्यानंतर 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा 145 दिवसांत प्रवास केला आणि 4,080 किमीचा प्रवास केला. या प्रवासाचे आणि भारत जोडो यात्रेचे सोनिया गांधी यांनी विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले. (हेही वाचा, Rahul Gandhi with Sonia Gandhi: राहुल गांधी यांचे मातृप्रेम; सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल)

व्हिडिओ

ट्विट

सोनिया गांधी यांनी भाजपवरील निशाणा कायम ठेवत म्हटले की, भाजप देशात द्वेषाची आग भडकवत आहे. यात अल्पसंख्याक, महिला, दलित, आदिवासी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण भाजपच्या राजवटीचा जोमाने सामना केला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवला पाहिजे.