BJP MLA Beats Municipal Officer (Photo Credits: ANI)

निवडणुकीच्या काळात जनतेला मायबापाचा दर्जा देणाऱ्या राजकारण्यांचा सत्तेत येताच बदलणारा सूर आपण याआधी सुद्धा पहिला असेल. असाच एक प्रकार आज, इंदौर (Indore) मध्ये पाहायला मिळाला. भाजपाचे (BJP) राष्ट्रीय सचिव कैलाश  विजयवर्गीय (Kailash Vijayvargiy)  यांचे सुपुत्र आमदार आकाश विजयवर्गीय (Aakash Vijayvargiy)  यांनी इंदौर मध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हे कर्मचारी गंजी कंपाउंड मधील मोडकळीस आलेली इमारत तोडण्यासाठी आले होते. यावेळी एकाने हा प्रसंग आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे, हा व्हिडीओ सोशल मीडिया वरून व्हायरल होत असून आकाश यांच्या वर्तवणुकीवर जोरदार टीका होत आहेत. या प्रकरणी आताच आकाश यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ANI ट्विट

विभागीय अधिकारी धीरेंद्र बायस आणि असीत खरे इंदूर महापालिकेच्या टीमसह  धोकादायक इमारत तोडण्यासाठी पोहोचले होते. या धोकादायक इमारतीत एकूण 5  कुटुंबे राहतात. यातील एका भाडेकरूचा एका अधिकाऱ्याशी वाद झाला. इतक्यात, आमदार आकाश विजयवर्गीय तिथे पोहोचले आणि त्यांचाही अधिकाऱ्यांशी वाद सुरू झाला.सुरवातीला  आकाश यांनी  5 मिनिटांच्या आत इथून निघून गेला नाहीत, तर जे काही होईल त्याला तुम्हीच जबाबदार असाल अशा शब्दात कर्मचाऱ्यांना धमकावले मात्र हे कर्मचारी जायला तयार नसल्याचे पाहून  आकाश यांनी हातात बॅट घेत धीरेंद्र बायस यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनीही बायस यांना मारहाण केली.

या प्रकरणी आकाश यांनी माध्यमाशी बोलताना उलट आपल्या वागण्याचे समर्थन केले आहे. यापुढे भ्रष्ट कर्मचाऱयांना अशीच वागणूक मिळेल, आधी आवेदन मग निवेदन आणि त्यानंतर दनादान असा आपला पवित्रा असल्याचे सुद्धा आकाश यांनी म्हंटले आहे. गुजरात मध्ये BJP आमदाराची गुंडशाही, भर रस्त्यात महिलेला लाथा बुक्क्यांनी केली मारहाण (Watch Video)

ANI ट्विट

दरम्यान, मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी या घटनेबाबत बोलताना " नेता कितीही मोठा असो, जर त्याने कायदा हातात घेतला, तर कायदा आपले काम नक्कीच करेल"अशी प्रतिक्रिया दिली आहे.