देशात कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण आढळले होते. यातील एक रुग्ण दिल्ली तर दुसरा रुग्ण तेंलगणामधील आहे. तसेच राजधानी दिल्लीत आढळलेला कोरोनाचा रुग्ण हा नुकताच इटलीतून आला होता. तसेच तेलंगणा येथे आढळलेला दुसरा रुग्ण हा दुबईतून भारतात आला होता. तर खबरदारीचा उपाय म्हणून परदेशात जाणे टाळावे असे आरोग्यंमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जाळे देशभरात पसरले आहे. तर कोरोना व्हायरसमुळे मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून चीन मध्ये 38 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 2981 वर पोहचली आहे. तर केरळ मध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळल्यानंतर नवी दिल्ली, तेलंगणा आणि जयपूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर भारतात एकूण कोरोनाचे सहा रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले होते. त्यापैकी केरळातील पहिल्या 3 रुग्ण बरे झाले असून अन्य 3 जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच दिल्लीत सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते.
आग्रामधील 6 जणांना कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आली होती. या सर्व रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल लॅबोरेटरीत पाठवले. तर ताज्या अपडेटनुसार, दिल्लीतील 6 जणांची कोरोना व्हायरसची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती एएनआय यांनी दिली आहे.उत्तर प्रदेशातील नोएडा येथे कोरोना व्हायरस लागण झाल्याची बाब समोर आली होती. मात्र कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्या परिवाराला सफदरजंग रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. (Coronavirus Outbreak: जगभरात COVID-19 ने घेतले 3000 बळी; 88,000 जणांना लागण)
Six who came in contact with Coronavirus infected Delhi man test negative
Read @ANI Story| https://t.co/EjDEeLzNWV pic.twitter.com/TZ9njiX3a5
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2020
तर कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारकडून नवीन प्रवासी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार चीन, इराण, कोरिया, सिंगापूर आणि इटली येथे जाण्याचा प्रवास टाळावा असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी भारतीयांना सल्ला दिला आहे. तसेच या नियमावलीनुसार, चीन आणि इराणला जाणाऱ्या नागरिकांना व्हिसा देण्यात येणार नाही. तसेच गंभीर परिस्थितीत इतर देशात जाण्यासही मनाई केली जाण्याची शक्यता आहे.