AC local trains (Photo Credit: PTI)

नववर्षाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांसाठी एक आनंदवार्ता आहे. मध्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. या वर्षात मध्यरेल्वे मार्गावर चक्क सहा एसी लोकल धावणार आहेत. त्यामुळे गारेगार प्रवासाचा अनुभव फक्त पश्चिम रेल्वे (Western Railway)  प्रवाशांनाच नाही तर मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनाही मिळणार आहे. खूशखबर! सेंट्रल रेल्वेवरुन लवकरच धावणार 'मुंबई-पुणे-मुंबई' लोकल

 2019 मध्ये एकूण 12 एसी लोकल रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. त्यापैकी सहा पश्चिम तर सहा मध्य रेल्वे मार्गावर धावतील. मध्य रेल्वे प्रवाशांना देणार नववर्षाची भेट; 66 नव्या सेवा तर, 49 सेवांचा विस्तार!

मध्य रेल्वेवरुन धावणार राजधानी

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी अजून एक दिलासादायक बातमी आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भातली माहिती दिली असून आता मध्य रेल्वेवरुन राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेस गुजरातऐवजी मध्यप्रदेशातून प्रवास करेल. सीएसएमटी ते दिल्ली या मार्गे राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास होईल. सीएसएमटीहून ही गाडी थेट कल्याणला थांबेल, त्यानंतर नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झांसी, आग्रा आणि हजरत निजामुद्दीन मार्गे जाईल.